भारताचा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत असा राहिला प्रवास, जाणून घ्या

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर पाकिस्तान आणि दुबईत पार पडली. भारताचे सर्व सामने दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात पार पडली. भारताने साखळी फेरीत बांग्लादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडला पराभूत केलं. तर उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाला नमवलं. अंतिम फेरीत न्यूझीलंडला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं आहे.

| Updated on: Mar 09, 2025 | 10:00 PM
1 / 6
भारताने आणखी आयसीसी ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. टी20 वर्ल्डकपनंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने दुसरं जेतेपद मिळवलं आहे. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवर तिसऱ्यांदा नाव कोरलं. या स्पर्धेत भारताचा प्रवास कसा राहिला ते जाणून घेऊयात...

2 / 6
साखळी फेरीत भारताचा पहिला सामना बांगलादेशशी झाला. भारताने या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम गोलंदाजी करावी लागील. भारताने बांगलादेशला 49.4 षटकात 228 धावांवर रोखलं आणि विजयासाठी 229 धावांचं आव्हान मिळालं. हे आव्हान भारताने 6 विकेट आणि 21 चेंडू राखून जिंकलं.

3 / 6
भारताचा दुसरा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी झाला. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 49.4 षटकात 241 धावा केल्या आणि विजयासाठी 242 धावा दिल्या. हे आव्हान भारताने 4 गडी गमवून 42.3 षटकात पूर्ण केलं. या सामन्यात विराटने शतक ठोकलं.

4 / 6
भारताचा तिसरा सामना न्यूझीलंडशी झाला. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं. भारताला 9 गडी गमवून 249 धावा करता आल्या आणि विजयासाठी 250 धावांचं आव्हान दिलं. भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त खेळी  करत न्यूझीलंडला 205 धावांवर रोखलं आणि 44 धावांनी विजय मिळवला.

5 / 6
उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 265 धावांचं मोठं आव्हान दिलं. हे आव्हान भारताने 6 गडी गमवून 48.1 षटकात पूर्ण केलं. यासह भारताने तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली.

6 / 6
अंतिम फेरीत भारताचा सामना पुन्हा एकदा न्यूझीलंडशी झाला. या स्पर्धेत पाचव्यांदा रोहित शर्माने नाणेफेक गमावली. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 गडी गमवून 251 धावा केल्या आणि विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारताने 6 गडी गमवून विजय मिळवला.  (सर्व फोटो- बीसीसीआय, आयसीसी)