
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या लढतीत भारत ऑस्ट्रेलिया हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना 30 ऑक्टोबरला नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये आयोजित केला आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. पण या सामन्यावर पावसाची वक्रदृष्टी असणार आहे. (Photo-PTI)

कोकणाच्या दक्षिणेकडील भागात कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाल्याने मुंबईत अधूनमधून पाऊस पडत आहे. पुढील 48 ते 72 तासांत मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 30 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत होणाऱ्या उपांत्य सामन्यादरम्यान दुपारी पावसाची शक्यता 69 टक्के आहे. या दिवशी एकूण 3.8 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Photo-PTI)

आयसीसीने उपांत्य फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यासाठी एक दिवस राखून ठेवला आहे. त्यामुळे हा सामना ठरल्या दिवशी झाला नाही तर 31 ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे. पण या दिवशीही पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे. त्यामुळे सामना रद्द करण्याची वेळ येऊ शकते. (Photo-PTI)

भारत ऑस्ट्रेलिया सामना राखीव दिवशीही झाला नाही तर त्याचा थेट फायदा ऑस्ट्रेलियाला होणार आहे. ऑस्ट्रेलियाला थेट अंतिम फेरीचं तिकीट मिळणार आहे. तर भारताला उपांत्य फेरीचा सामना न खेळताच गाशा गुंडाळावा लागेल. (Photo-PTI)

आयसीसीच्या नियमानुसार पावसामुळे सामना रद्द झाल्यास अंतिम फेरीत कोण जाणार हे गुणातिलकेच्या आधारावर ठरवलं जाईल. ऑस्ट्रेलियाने एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे 13 गुणांसह आघाडीवर आहे. तर भारतीय संघ 6 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीची संधी मिळेल. (Photo-PTI)