बांग्लादेश कसोटीत जसप्रीत बुमराहची कमाल, 4 विकेटसह आणखी एका विक्रमाला गवसणी

बांग्लादेश कसोटीच्या दुसऱ्या दिवसावर टीम इंडियाने अधिराज्य गाजवलं. भारताने पहिल्या डावात 376 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 149 धावांवर तंबूत परतला. यात जसप्रीत बुमराहने 4 गडी बाद करून एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

| Updated on: Sep 20, 2024 | 4:32 PM
1 / 5
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात टीम इंडियाने 376 धावा केल्या. तर बांगलादेशचा संघ 149 धावांवर तंबूत परतला. त्यामुळे भारताला 227 धावांची मजबूत आघाडी मिळाली आहे.

2 / 5
बांगलादेशच्या डावात जसप्रीत बुमराहने भेदक गोलंदाजी केली. 11 षटकात 1 निर्धाव षटक टाकलं. तसेच 50 धावा देत 4 गडी बाद केले. यावेळी त्याचा इकोनॉमी रेट 4.50 इतका होता. यासह जसप्रीत बुमराहने एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

3 / 5
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 विकेटचा पल्ला गाठला आहे.अशी कामगिरी करणारा सहावा भारतीय गोलंदाज ठरला आहे.  हसन महमूदला बाद करताच त्याने या विक्रमला गवसणी घातली आहे.

4 / 5
वनडे क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराह हा वेगाने 100 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. दुसरीकडे टी20 क्रिकेटमध्ये झटपट 50 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. आता त्याच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोवला गेला आहे. बुमराहने कसोटीत 159 विकेट, वनडेत 149 विकेट, तर टी20 क्रिकेटमधये 89 विकेट घेतल्या आहेत.

5 / 5
बुमराहच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 हून अधिक विकेट घेणाऱ्या वेगवान गोलंदांजामध्ये कपिल देव आघाडीवर आहे. कपिल देवने 687 विकेट घेतल्या आहेत. झहीर खान 597, जवागल श्रीनाथ 551, मोहम्मद शमी 448 आणि इशांत शर्माने 434 विकेट घेतल्या आहेत. (सर्व फोटो- बीसीसीआय)