PHOTO : षटकारांचा पाऊस पाडणारे धडाकेबाज, IPL मधील सिक्सर किंग कोण कोण?

| Updated on: Sep 15, 2021 | 4:12 PM

आयपीएलचा (IPL 2021) दुसरा हंगाम 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयपीएलचा थरार सुरु होणार आहे. यूएईमध्ये मैदानं लहान असल्यामुळे इथे उत्तुंग षटकार पाहायला मिळतात. प्रत्येक संघात सिक्सर किंग आहेत. त्यावर एक नजर-

1 / 9
टी -20 क्रिकेट म्हटलं की फलंदाज धावांचा पाऊस पाडतात. इथे एकेरी-दुहेरी धावा कमी होतात, पण चौकार-षटकारांचा पाऊस पडतो. IPL मध्ये हा थरार अनुभवायला मिळतो.  आयपीएलचा (IPL 2021) दुसरा हंगाम 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयपीएलचा थरार सुरु होणार आहे. यूएईमध्ये मैदानं लहान असल्यामुळे इथे उत्तुंग षटकार पाहायला मिळतात. प्रत्येक संघात सिक्सर किंग आहेत. त्यावर एक नजर-

2 / 9
ख्रिस गेल हा आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू आहे. गेलने आतापर्यंत 140 सामन्यात 357 षटकार मारले आहेत. सध्या गेल पंजाब किंग्सकडून खेळतो.  त्याआधी तो विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आहे. गेल RCB कडून आतापर्यंत सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू ठरला आहे. त्याने RCB कडून खेळताना  एकूण 239 षटकार मारले आहेत.

3 / 9
कायरन पोलार्ड हा सुरुवातीपासून मुंबई इंडियन्स या संघाकडून खेळत आहे. पाच वेळा विजेता मुंबईसाठी पोलार्डने अनेक संस्मरणीय आणि सामना जिंकणाऱ्या खेळी खेळल्या आहेत. आयपीएलमध्ये पोलार्ड हा मुंबईकडून सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू आहे. त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना 211 षटकार ठोकले आहेत.

4 / 9
तीन वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जबद्दल बोलायचे झाले, तर संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने CSK कडून सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. धोनीने CSK कडून सर्वाधिक 187 षटकार ठोकले.

5 / 9
सनरायझर्स हैदराबादने 2016 मध्ये डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात विजेतेपद पटकावले. आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यात संघाने त्याला कर्णधारपदावरून हटवले होते, पण वॉर्नर हा आयपीएलमध्ये सनरायझर्सकडून सर्वाधिक षटकार खेचणारा फलंदाज आहे. त्याने सनरायझर्सकडून खेळताना 143 षटकार ठोकले आहेत.

6 / 9
कोलकाता नाईट रायडर्सकडेही एक असा फलंदाजही आहे जो त्याच्या झंझावाती खेळी आणि मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. आंद्रे रसेल असे त्या फलंदाजाचे नाव आहे. रसेलने केकेआरसाठी आतापर्यंत एकूण 139 षटकार मारले आहेत. केकेआरकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो फलंदाज आहे.

7 / 9
राजस्थान रॉयल्सने 2008 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. तेव्हा शेन वॉटसन हा या संघाचा महत्त्वाचा भाग होता. नंतर तो RCB आणि CSK कडूनही खेळला. पण आतापर्यंत राजस्थानकडून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम शेन वॉटसनच्या नावावर आहे. वॉटसनने राजस्थानकडून खेळताना 109 षटकार ठोकले आहेत.

8 / 9
ऋषभ पंत युवा आणि स्फोटक फलंदाज आहे. तो आयपीएलमध्ये सुरुवातीपासून दिल्लीकडून खेळत आहे. हा युवा फलंदाज त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. पंतने दिल्लीकडून 107 षटकार ठोकले आहेत. तो त्याच्या संघासाठी आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू आहे.

9 / 9