IPL 2023 : आरसीबी विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात पुन्हा सामना होणार? कधी आणि कसं ते जाणून घ्या

IPL 2023 : आयपीएल स्पर्धेत आता सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघाची. कारण या दोन्ही संघाचं वाद पाहता चाहत्यांना अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे हे दोन संघ कधी भिडणार? याचा वाट पाहात आहेत.

| Updated on: May 03, 2023 | 1:18 AM
1 / 6
आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन संघ कट्टर प्रतिस्पर्धी बनले आहेत. दोन सामन्यातील आक्रमकपणा पाहून दोन्ही संघाचे चाहते याकडे अशाच नजरेने पाहात आहेत.(Photo : IPL/ BCCI/Twitter)

2 / 6
आयपीएल 2023 स्पर्धेत 10 एप्रिल रोजी आरसीबी विरुद्ध एलएसजी यांच्यातील सामना झाला. हा सामना लखनऊने 1 विकेटने जिंकल्यानंतर लखनऊच्या खेळाडूंनी आक्रमकपणे आनंद साजरा केला. एलएसजी संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरने आरसीबीच्या चाहत्यांना तोंडावर बोट गप्प बसण्याचा इशारा केला होता. (Photo : IPL/ BCCI/Twitter)

3 / 6
अपेक्षेप्रमाणे आरसीबीने दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाचा पराभव करून वचपा काढला. विशेषत: विराट कोहलीने गौतम गंभीरप्रमाणे तोंडावर बोट ठेवून तशीच कृती केली. सामन्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली. (Photo : IPL/ BCCI/Twitter)

4 / 6
इतका टोकाचा वाद झाल्यानंतर आता क्रीडारसिक हे दोन संघ पुन्हा कधी भिडणार याची वाट पाहात आहेत. यासाठी गुगलवर सर्चिंगदेखील सुरु आहे. पण आता या दोन्ही संघांचा सामना नाही. कारण साखळी फेरीतील दोन्ही सामने खेळले आहेत. (Photo : IPL/ BCCI/Twitter)

5 / 6
असं असलं तरी प्लेऑफमध्ये हे दोन संघ पुन्हा भिडण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं तर नक्कीच या दोन्ही संघाचा सामना होऊ शकतो. क्वालिफायर किंवा एलिमिनेटर सामन्यात भिडू शकतात. (Photo : IPL/ BCCI/Twitter)

6 / 6
अंतिम फेरीतही दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता आहे. पण त्या आधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांना प्लेऑफमध्ये पोहोचायचे आहे. त्यानंतरच दोन्ही संघांचा आमने-सामने येण्याचा निर्णय होईल. (Photo : IPL/ BCCI/Twitter)