
आयपीएल 2024 अर्थात 17 व्या पर्वासाठी 19 डिसेंबर 2023 रोडी मिनी लिलाव पार पडणार आहे. या सामन्यात काही खेळाडूंना घेण्यासाठी जबरदस्त चुरस पाहायला मिळेला. यापैकी एक म्हणजे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ट्रेव्हिस हेड हा आहे. त्याला संघात घेण्यासाठी पाहीजे तितके पैसे मोजण्याची फ्रेंचायसीची तयारी आहे.

दिल्ली कॅपिटल्सने ट्रेव्हिस हेडसाठी जाळं टाकून ठेवलं आहे. याला दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पॉटिंग याने दुजोरा दिला आहे. ट्रेव्हिस हेडला संघात घेण्यासाठी गेल्यावर्षीच फिल्डिंग लावली होती. पण आयपीएल दरम्यान लग्न ठरलं आणि त्याने यातून माघार घेतल्याचं रिकी पाँटिंग याने सांगितलं.

गेल्या पर्वात आम्ही ट्रेव्हिस हेडला संघात घेण्यासाठी सज्ज होतो. पण त्याने आयपीएल दरम्यान तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता. त्यामुळे फ्रेंचायसीने बोली लावण्यात रस दाखवला नाही, असं पाँटिंग म्हणाला.

आता मिनी लिलावात ट्रेव्हिस हेडचं नाव आघाडीवर आहे. प्रशिक्षक रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स ट्रेव्हिस हेडला संघात घेण्यासाठी रणनिती आखेल यात शंका नाही. पण इतर फ्रेंचायसी सुद्धा ट्रेव्हिस हेडवर बोली लावतील. त्यामुळे हेडसाठी मोठी रक्कम मोजावी लागेल.

ट्रेव्हिस हेडने आयपीएल 2016-2017 मध्ये आरसीबीसाठी एकूण 10 सामने खेळले. यात त्याने फक्त 205 धावा केल्या होत्या. त्यानंतर आरसीबीने त्याला रिलीज केलं. आता हेडचा फॉर्म पाहता आरसीबी देखील त्याला संघात घेण्यासाठी बोली लावू शकते.

दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंत, प्रवीण दुबे, डेव्हिड वॉर्नर, विकी ओस्वाल, पृथ्वी शॉ, एनरिक नोकिया, अभिषेक पोरेल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, लुंगी एनगिडी, ललित यादव, खलील अहमद, मिशेल मार्श, इशांत शर्मा, इशांत शर्मा , मुकेश कुमार या खेळाडूंना कायम ठेवलं आहे.