
बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान याच्यासोबत केकेआरला चीअर करणाऱ्या महिलेचं नाव पूजा ददलानी असं आहे. पूजा ददलानी शाहरुख खान याची मॅनेजर आहे.

दिल्ली विरुद्ध केकेआर सामन्यादरम्यान पूजा ददलानी शाहरुख याच्यासह स्टेडियममध्ये उपस्थित होती. यावेळेस पूजा आणि शाहरुख या दोघांचे फोटो व्हायरल झाले. पूजा शाहरुखची 12 वर्षांपासून मॅनेजर आहे.

शाहरुखचा मुलगा आर्यन याला 3 वर्षांपूर्वी एका प्रकरणात अटक करण्यात आली. तेव्हा सुनावणी वेळेस पूजा शाहरुखसोबत कायम सोबत असायची.

शाहरुखचे इंस्टाग्रामवर 47 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर शाहरुख 6 जणांना फॉलो करत. पूजा त्या 7 जणांपैकी एक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूजाचा पगार 7-8 कोटी इतका आहे.

पूजा ददलानी 2008 साली हितेश गुरनानी यांच्यासह विवाहबंधनात अडकली. पूजा-हितेश यांच्या मुलाचं नाव रेयना आहे.