
17 वर्षीय क्वेना माफाकाला मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पदापर्णाची संधी दिली. आयपीएल इतिहासात तिसरा सर्वात कमी वयाचा विदेशी खेळाडू ठराल आहे. इतकंच काय तर त्याच्या हाती पहिला चेंडू सोपवला.

आयपीएल 2024 स्पर्धेत नाणेफेकीचा कौल जिंकत मुंबई इंडियन्सने गोलंदाजी स्वीकारली. तसेच सनरायझर्स हैदराबादला फलंदाजी निमंत्रण दिलं. हैदराबादने 3 गडी गमवून 277 धावा केल्या आणि विजयासाठी 278 धावांचं आव्हान दिलं. या स्पर्धेत अनेक विक्रम रचले गेले. यात काही नकोसे विक्रमही आहेत.

मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या 17 वर्षीय क्वेना माफाका याचीही चर्चा रंगली. पदापर्णाच्या पहिल्याच सामन्यात क्वेना माफाकाच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. 4 षटकात 66 धावा दिल्या. आयपीएल इतिहासातील एक महागडा स्पेल ठरला आहे. त्याला एक गडी बाद करता आला नाही.

श्रीलंकेचा दिलशान मधुशंका दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी मुंबई इंडियन्सने माफाकाला आपल्या संघात घेतलं. दक्षिण अफ्रिकन गोलंदाज अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत प्लेयर ऑफ टूर्नामेंट ठरला होता. मात्र आयपीएल दिग्गज फलंदाजांसमोर काही एक चाललं नाही.

माफाकाने पहिलं षटक चांगलं टाकलं आणि 7 धावा दिल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकापासून धुलाई सुरु झाली. दुसऱ्या षटकात 22 धावा दिल्या. तिसऱ्या षटकात 20 धावा आल्या. तर चौथ्या षटकात एकूण 18 धावा आल्या. असं करून चार षटकात एकूण 66 धावा आल्या.