
आयपीएल 2024 साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सज्ज झाली आहे. गेल्या हंगामात आरसीबीचं स्वप्न भंगलं होतं. साखळी फेरीतच आरसीबीचं आव्हान संपुष्टात आलं होतं.

आता 14 पैकी फक्त 7 सामने जिंकलेल्या आरसीबी संघाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित होत आहेत. यावेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने घरच्या मैदानावर 7 सामने खेळले. चिन्नास्वामी स्टेडियमवर केवळ 3 सामने जिंकले होते.

2019 नंतर आरसीबी संघ लीग स्टेजमधून बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे फाफ डुप्लेसिसच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

डुप्लेसिसने गेल्या दोन हंगामात आरसीबी संघाचे नेतृत्व केले आहे. फाफच्या नेतृत्वाखाली आरसीबीने एकूण 27 सामने खेळले आहेत. त्यात फक्त 14 सामन्यांत विजय मिळवला आणि 13 सामने गमावले.

आरसीबीने यावेळी चिन्नास्वामी स्टेडियमवर केवळ 3 सामने जिंकले. त्यापैकी एक सामना विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. म्हणजेच डुप्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबीने घरच्या मैदानावर फक्त दोन सामने जिंकले आहेत.

डुप्लेसिसच्या अनुपस्थितीत विराट कोहलीने तीन सामन्यांमध्ये आरसीबी संघाचे नेतृत्व केले. यावेळी त्यांनी आपल्या आधीच्या आक्रमक नेतृत्वाने लक्ष वेधले होते. त्यामुळे आरसीबी फ्रँचायसी पुन्हा कोहलीला कर्णधारपद देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नेतृत्वाच्या भारामुळे कोहलीने आरसीबी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. भारतीय संघ आणि आरसीबीचे नेतृत्व करणे हे ओझे ठरत आहे, असं सांगत त्याने सांगितलं होतं.

विराट कोहलीने टीम इंडियाच्या तीन संघांचे कर्णधारपद सोडले आहे. त्यामुळे त्याचावर आता कोणतीच जबाबदारी नाही. कोहली आता पूर्णपणे मोकळा असून जबाबदारी पु्न्हा एकदा खांद्यावर घेऊ शकतो.


त्यामुळे आयपीएलच्या पुढच्या हंगामात आरसीबी फ्रँचायसीने पुन्हा विराट कोहलीला कर्णधारपद दिले तर आश्चर्य वाटायला नको.