
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील सलामीच्या सामन्यात गतविजेता कोलकाता विरुद्ध बंगळुरु एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. हा सामना 22 मार्चला होणार आहे. मात्र त्याआधीच एकूण 5 खेळाडू स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. या 5 खेळाडूंची एकूण किंमत ही 13 कोटी 55 लाख रुपये आहे. (Photo Credit: (PTI / R Senthilkumar)

ऑलराउंडर ब्रायडन कार्स याला पायाच्या दुखापतीमुळे 18 व्या मोसमाला मुकावं लागलं आहे. ब्रायडन कार्स याला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान पायाला दुखापत झाली होती. ब्रायडन कार्स याला हैदराबादने 1 कोटी रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं होतं. कार्स बाहेर झाल्याने त्याच्या जागी विआन मल्डर याचा समावेश करण्यात आला आहे. हैदराबादने मल्डरसाठी 75 लाख रुपये मोजले आहेत. (Photo Credit: AFP)

अफगाणिस्तानचा स्टार लेग स्पिनर अल्लाह गजनफर यालाही दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे. गजनफरसाठी मुंबईने 4.8 कोटी रुपयांची बोली लावून आपल्याकडे घेतलं होतं. मात्र गजनफर बाहेर झाल्याने आता त्याच्या जागी अफगाणिस्तानच्या मुजीब उर रहमान याचा समावेश करण्यात आला आहे. मुंबईने गजनफर याला 2 कोटी रुपयांत आपल्या टीममध्ये घेतलं आहे. (Photo Credit: Afghanistan Cricket Board)

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लिझाड विलियम्स याला गुडघ्याच्या दुखापतीमुळे 18 व्या मोसमाला मुकावं लागलं आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सने लिझाडच्या जागी कोर्बिन बॉश याचा समावेश करण्यात आला आहे. बॉश याने आतापर्यंत आयपीएल पदार्पण केलेलं नाही. (Photo Credit: Ipl)

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक यालाही दुखापत भोवली आहे. उमरानला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या जागी चेतन साकरिया याचा कोलकाता संघात समावेश करण्यात आला आहे. (Photo Credit: PTI)

इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक याने देशाला प्राधान्य देत आयपीएलच्या 18 व्या मोसमातून माघार घेतलीय. हॅरीची आयपीएल स्पर्धेतून ऐन वेळेस माघार घेण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली आहे. त्यामुळे बीसीसीआयने हॅरीवर नियमांनुसार 2 वर्षांची बंदी घातली आहे. दिल्लीने हॅरीसाठी सर्वाधिक 6 कोटी 25 लाख रुपयांची बोली लावली होती. (Photo Credit: PTI)