
इंडियन प्रीमियर लीगच्या 42व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने येणार आहेत. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणारा हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. या सामन्याच्या निकालानंतर लगेचच गुणतालिकेत बदल होणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने हा सामना जिंकला तर 12 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर जाऊ शकतात. तसेच प्लेऑफचा मार्ग आणखी सोपा होईल. त्यामुळे आजचा सामना आरसीबीसाठी खूपच महत्त्वाचा आहे.

आरसीबी सध्या आयपीएल गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. रॉयल्सचा नेट रन रेट +0.472 आहे. आठ सामन्यांत पाच विजय आणि तीन पराभव आहेत. जर राजस्थान रॉयल्सला हरवले तर ते चांगल्या नेट रन रेटसह पॉइंट्स टेबलमध्ये वर जाऊ शकतात.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स आतापर्यंत 33 सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत. यात आरसीबीने 16 वेळा, तर राजस्थान रॉयल्सने 14 वेळा विजय मिळवला आहे. विविध कारणांमुळे आणखी तीन सामने रद्द करण्याची वेळ आली होती.

दोन्ही संघांमधील शेवटच्या 5 सामन्यांचा विचार केला तर आरसीबीचा वरचष्मा दिसून येईल. गेल्या पाच सामन्यांपैकी आरसीबीने 3 सामने, तर राजस्थानने 2 सामने जिंकले आहेत. आरसीबीने पहिल्या सामन्यात राजस्थानला पराभूत केलं आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या तशीच अपेक्षा करू शकतो. (सर्व फोटो- बीसीसीआय/आयपीएल)