IPL 2025 : गुजरातच्या सलामी जोडीने रचला इतिहास, एका पर्वात केली इतकी मोठी कामगिरी

आयपीएल 2025 स्पर्धेत गुजरात टायटन्सची विजयी घोडदौड सुरु आहे. सलामीचे फलंदाजच संघाला विजयाच्या वेशीवर आणून सोडत आहेत. गुजरात टायटन्सने दिल्लीला 10 विकेट्सने पराभूत केलं आणि प्लेऑफमध्ये स्थान मिळावलं. यात शुबमन गिलने नाबाद 93 आणि साई सुदर्शनने नाबाद 108 धावा करत इतिहास रचला आहे.

| Updated on: May 19, 2025 | 4:48 PM
1 / 5
आयपीएल 2025 च्या 60व्या सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सवर 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह गुजरात प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. या सामन्यात शुबमन गिल-साई सुदर्शन यांनीही इतिहास रचला. आता हा इतिहास खोडून काढणं पुढे जाऊन वाटतं तितकं सोपं नाही.

2 / 5
साई सुदर्शनने नाबाद 108 धावा केल्या तर कर्णधार शुबमन गिल 93 धावांवर नाबाद राहिला. गुजरातने दिल्लीने दिलेले 200 धावांचे लक्ष्य विजयासाठी एक षटक शिल्लक असताना पूर्ण केले. या विजयासह गुजरात संघाने पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली आहे. तसेच गुणतालिकेत पहिलं स्थान पटकावलं आहे.

3 / 5
आयपीएल 2025 स्पर्धेत 800 पेक्षा जास्त धावा करणारी गिल-सुदर्शन जोडी इतिहासातील पहिली भारतीय जोडी ठरली. या जोडीने एकूण 839 धावा केल्या. आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही भारतीय जोडीने केलेली सर्वोच्च भागीदारी आहे.

4 / 5
यापूर्वी, 2021मध्ये धवन-पृथ्वी शॉ जोडीने 744 धावा केल्या होत्या, तर 2020 मध्ये केएल राहुल-मयंक अग्रवाल जोडीने  671 धावा केल्या होत्या. पण आता शुबमन गिल आणि साई सुदर्शन ही जोडी खूप पुढे निघून गेली आहे. अजूनही साखळी फेरीत दोन सामन्यांचा खेळ बाकी आहे. जर यातही बॅट चमकली तर 1000 धावांचा पल्ला हमखास गाठतील.

5 / 5
दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर झालेल्या या सामन्यात साई सुदर्शन हा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून उतरला होता. त्याने आयपीएलमधील दुसरे शतक झळकावले. फलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर गिल आणि सुदर्शन दोघांनीही आक्रमक खेळ केला. (सर्व फोटो- IPL/BCCI)