
ऋषभ पंतने आयपीएल स्पर्धेत इतिहास घडवला. ऋषभ पंत आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. लखनऊ सुपर जायंट्सने पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले. तसेच पंतला आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी (IPL 2025) लखनऊचं कर्णधार करण्यात आलं. (Photo Credit : @LucknowIPL X Account)

श्रेयस अय्यर ऋषभ पंतनंतर आयपीएलमधील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. पंजाब किंग्सने श्रेयससाठी 26 कोटी 75 लाख रुपये मोजले. तसेच श्रेयसला पंजाबचं कर्णधारही करण्यात आलंय. श्रेयसने गेल्या हंगामात आपल्या नेतृत्वात कोलकाताला चॅम्पियन्स केलं होतं. (Photo Credit : @PunjabKingsIPL X Account)

चेन्नई सुपर किंग्सने ऋतुराज गायकवाड याला 18 व्या मोसमाआधी रिटेन केलं होतं. चेन्नईने ऋतुराजसाठी 18 कोटी मोजले. महेंद्रसिंह धोनी याने 2024 साली ऋतुराजकडे कर्णधारपदाचा पदभार दिला होता. यंदाही ऋतुराज चेन्नईचं नेतृत्व करणार आहे. (Photo Credit : Ruturaj Gaikwad X Account)

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याच्याकडे सनरायजर्स हैदराबादच्या कर्णधारपदाची सुत्रं आहेत. एसआरएचने पॅटला 18 कोटी रुपयांत रिटेन केलं. पॅटच्या नेतृत्वात हैदराबाद गेल्या हंगामात उपविजेता राहिली. (Photo Credit : AFP)

राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसन याला 18 कोटी रुपयांत रिटेन केलं. संजू 2018 पासून राजस्थानसोबत आहे. संजू 2021 पासून राजस्थानचं नेतृत्व करत आहे. संजूच्या नेतृत्वात राजस्थान 2022 साली उपविजेता ठरली होती. (Photo Credit : @IamSanjuSamson X Account)

दिल्ली कॅपिट्ल्सने यंदा अक्षर पटेल याची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. अक्षर 2019 पासून दिल्लीसोबत आहे. अक्षरचं दिल्लीचं पूर्णवेळ नेतृत्व करण्याची पहिलीच वेळ आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने अक्षरला 16 कोटी 50 लाख रुपयांत रिटेन केलंय. (Photo Credit : @akshar2026 X Account)

रॉयल चँलेजर्स बंगळुरने यंदा रजत पाटीदार याला रॉयल चँलेजर्सच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. आरसीबीने रजतला 11 कोटी रुपये खर्चून रिटेन केलं आहे. (Photo Credit : @rrjjt_01 X Account)

गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने अनुभवी अजिंक्य रहाणे याला कर्णधार केलं आहे. केकेआरने रहाणेला 1 कोटी 50 लाख रुपयांत आपल्या गोटात घेतलं आणि कर्णधार केलं. रहाणेने याआधी 2018 आणि 2019 साली आयपीएलमध्ये नेतृत्व केलं आहे. (Photo Credit : PTI)

शुबमन गिल गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदी कायम आहे. शुबमन गिल याने 2024 अर्थात आयपीएलच्या 17 व्या मोसमाआधी हार्दिक पंड्याची जागा घेतली होती. गुजरात टायटन्सने शुबमनला मेगा ऑक्शनआधी 16 कोटी 50 लाख रुपये मोजून आपल्या गोटात कायम ठेवलं. (Photo Credit : PTI)

ऑलराउंडर हार्दिक पंड्या यंदाही मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. हार्दिकच्या नेतृत्वात मुंबईची गत हंगामात निराशाजनक कामगिरी राहिली. मुंबई 17 व्या हंगामात पॉइंट् टेबलमध्ये सर्वात शेवटी अर्थात 10 व्या स्थानी होती. मुंबईने हार्दिकला हेल्या हंगामातल ट्रेडद्वारे गुजरात टायटन्समधून आपल्या गोटात घेतलं होतं. (Photo Credit : PTI)