
आयपीएल 18 व्या मोसमाला (IPL 2025) 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. हंगामातील पहिल्या सामन्यात कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यात लढत होणार आहे. त्याआधी ओपनिंग सेरेमनीचा थरार रंगणार आहे. या ओपनिंग सेरेमनीत अनेक कलाकार परफॉर्म करणार आहेत. (Photo Credit : IPL)

आतापर्यंत अनेक कलाकारांनी आयपीएलच्या विविध हंगामातील ओपनिंग सेरेमनीमध्ये परफॉर्मन्स केला आहे. यंदा रंगारंग कार्यक्रमासाठी बीसीसीआयने अर्जित सिंह आणि तमन्ना भाटीया या दोघांना आमंत्रित केलं आहे. (Photo Credit : IPL)

तसेच या रंगारंग कार्यक्रमात आणखी कोण कोण परफॉर्मन्स करणार? याबाबत क्रिकेट चाहत्यांना उत्सूकता आहे. आयपीएलने एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. (Photo Credit : IPL)

ओपनिंग सेरेमनीत अभिनेत्री दिशा पाटनी परफॉर्म करणार आहे. तसेच सिंगर श्रेया घोषाल या देखील परफॉर्म करणार आहे. (Photo Credit : IPL)

आयपीएल या एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन श्रेया घोषाल या परफॉम करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. श्रेया घोषाल यांनी हिंदीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. (Photo Credit : IPL)

दरम्यान कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यातील सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होईल. तर त्याआधी 6 वाजता ओपनिंग सेरेमनीला सुरुवात होणार आहे. (Photo Credit : IPL)