
आयपीएल 2025 स्पर्धेतील 21व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सच्या अष्टपैलू शार्दुल ठाकुरने नकोसा विक्रम रचला आहे. एकाच चेंडूवर सहा देऊन हा विक्रम केला आहे. तुम्हाला वाटलं असेल की षटकार मारला तर त्यात काय नवल.. पण तसं नाही... षटकार न देता सहा धावा दिल्या आहेत. कसं काय ते जाणून घ्या.

कोलकाता नाईट रायडर्सच्या डावातील 13वं षटक टाकण्यासाठी आलेल्या शार्दुल ठाकूर आला होता. त्याने सुरुवातच वाइडने केली. सलग 5 वाईड टाकले. म्हणजेच एकही चेंडू न टाकता 5 धावा दिल्या. तर सहावा चेंडू टाकत एक धाव देऊन पहिला चेंडू पूर्ण केला.

शार्दुल ठाकूरने एकाच चेंडूत सहा धावा देऊन एक नकोसा विक्रम रचला आहे. त्याने आयपीएलच्या इतिहासात एका षटकात सर्वाधिक चेंडू टाकणारा तिसरा गोलंदाज होण्याचा विक्रम केला आहे.

याआधी हा विक्रम मोहम्मद सिराज आणि तुषार देशपांडे यांच्या नावावर होता. 2023 मध्ये आरसीबीकडून खेळणाऱ्या सिराजने एकाच षटकात 11 चेंडू टाकले. तर तुषार देशपांडेनेही चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना 11 चेंडूत एक षटक पूर्ण केले होते.

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 11 चेंडू (wd,wd,wd,wd,wd,wd,1,1,0,4,2,W) टाकून शार्दुल ठाकूर आयपीएलमध्ये सर्वाधिक चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. त्याने आयपीएलमधील नकोशा रेकॉर्डधारकांच्या यादीत आपले नाव जोडले आहे. (सर्व फोटो- टीव्ही9 कन्नड)