IPL 2026: गुजरातकडून मिळालेल्या पराभवाचा धक्का पचवण्यापूर्वीच पॅट कमिन्सला बीसीसीआयचा दणका

आयपीएल 2026 स्पर्धेतील 56व्या सामन्यात गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादला पराभवाची धूळ चारली. 168 धावांचं लक्ष्य गाठताना संपूर्ण संघ 86 धावांवर गारद झाला. यामुळे सनरायझर्स हैदराबादचं प्लेऑफचं 16 गुणांचं गणित लांबलं आहे. असं असताना हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सला दणका बसला आहे.

| Updated on: May 13, 2026 | 4:45 PM
1 / 5
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादला गुजरात टायटन्सकडून 82 धावांनी पराभव पत्करावा लागला. टायटन्सने 20  षटकांत 5 गडी गमावून 168 धावा केल्या. पण सनरायझर्स हैदराबादने 86 धावांवर नांगी टाकली. यामुळे सनरायझर्स हैदराबादला 16 गुणांचं गणित जुळवण्यासाठी आणखी एक विजय थांबावं लागणार आहे.  (Photo: IPL/BCCI)

2 / 5
गुजरात टायटन्सविरुद्धच्या पराभवानंतर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सवर स्लो ओव्हर रेटचा ठपका ठेवण्यात आला. त्याने नियमाचे उल्लंघन केल्याचं स्पष्ट झाल्याने दंड ठोठावण्यात आला आहे.  बीसीसीआयने त्याच्यावर कारवाई केली आहे. (Photo: IPL/BCCI)

3 / 5
पॅट कमिन्सच्या बाबतीत स्लो ओव्हर रेट उल्लंघनाची ही पहिलीच घटना होती. त्यामुळे त्याला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. स्लो ओव्हर रेट उल्लंघन हे आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.22 चे उल्लंघन आहे. यासाठी किमान 12 लाखांचा दंड आहे. (Photo: IPL/BCCI)

4 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत अशी शिक्षा मिळालेला एकमेव कर्णधार नाही. त्याच्या आधीही अनेक कर्णधारांना अशी शिक्षा झाली आहे. श्रेयस अय्यर, शुबमन गिल, अजिंक्य रहाणे, हार्दिक पांड्या, ऋतुराज गायकवाड आणि अक्षर पटेल यांसारख्या कर्णधारांना हा दोषी ठरवण्यात आले आहे. (Photo: IPL/BCCI)

5 / 5
सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये जागा मिळवण्यासाठी एका विजयाची गरज आहे. तर आणि तरच 16 गुणांचं गणित सुटेल. हैदराबादचे दोन सामने शिल्लक आहेत. 18 मे रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि 22 मे रोजी आरसीबीशी सामना होणार आहे. (Photo: IPL/BCCI)

Follow Us