IPL 2026 : पहिल्याच मोसमात गोलंदाजाचा कहर, 15 वर्षांआधीचा हरभजनचा रेकॉर्ड ब्रेक

Allah Ghajanfar Broke Harbhajan Singh Most Wickets Record : जसप्रीत बुमराहसारख्या अनुभवी गोलंदाजाला विकेट्ससाठी संघर्ष करावा लागतोय. तर दुसऱ्या बाजूला नवख्या गोलंदाजाने मात्र आपल्या पहिल्याच मोसमात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करुन दाखवली आहे. जाणून घ्या अल्लाह गजनफर याने हरभजन सिंह याचा कोणता विक्रम मोडीत काढला आहे.

| Updated on: May 05, 2026 | 4:53 PM
1 / 5
मुंबई इंडियन्स टीम आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरली.  जसप्रीत बुमराह आणि इतर मुंबईचे गोलंदाज अपयशी ठरले. मात्र एका गोलंदाजाने कमाल केलीय.  विशेष म्हणजे पदार्पणातील हंगामातच या गोलंदाजांने आपला ठसा उमटवला आहे. (Photo Credit: PTI)

2 / 5
अल्लाह गजनफर या 20 वर्षीय गोलंदाजाने 19 व्या मोसमातून आयपीएल पदार्पण केलं. अल्लाह या हंगामाच्या सुरुवातीला प्रभावी ठरला नाही. मात्र त्यानंतर अल्लाहने आपली कमाल दाखवली आणि सातत्याने विकेट्स मिळवल्या. (Photo Credit: PTI)

3 / 5
अल्लाहने लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात 4 मे रोजी 1 विकेट घेताच रेकॉर्ड ब्रेक केला.  अल्लाहने लखनौच्या जॉश इंग्लिस याला आऊट करत 15 वर्षांआधीचा विक्रम मोडीत काढला. (Photo Credit: PTI)

4 / 5
अल्लाह जॉशला आऊट करताच मुंबईसाठी पावरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स मिळवणारा पहिला फिरकीपटू ठरला. अल्लाहची पावरप्लेमधील सहावी विकेट ठरली.  अल्लाहने यासह हरभजनसिंह याला मागे टाकलं.  हरभजन याने 2011 साली पावरप्लेमध्ये 5 विकेट्स घेतल्या होत्या. (Photo Credit: PTI)

5 / 5
अल्लाहने आयपीएल 2026 स्पर्धेत आतापर्यंत एकूण 12 विकेट्स मिळवल्या आहेत. अल्लाह आतापर्यंत 19 व्या मोसमात एकूण 8 सामने खेळला आहे.  (Photo Credit: PTI)

Follow Us