IPL 2026: निकोलस पूरनने प्रत्येक दुसऱ्या चेंडूवर मारला षटकार, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक

लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 229 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यात निकोलस पूरनने झंझावाती खेळी केली. त्याने 21 चेंडूत 63 धावा केल्या आणि विक्रमाची नोंदही केली.

| Updated on: May 04, 2026 | 9:32 PM
1 / 5
आयपीएल 2026 स्पर्धेत निकोलस पूरनची कामगिरी निराशाजनक ठरली. पण मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याला सूर गवसला आहे. त्याने 21 चेंडूत 63 धावांची खेळी केली.  पूरनने वैभव सूर्यवंशीलाही मागे टाकले आहे.  (Photo: PTI)

2 / 5
निकोलस पूरनने 16 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. मुंबई इंडियन्सविरुद्ध त्याचं वेगवान अर्धशतक आहे. हे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याने 7 षटकार मारले. तर संपूर्ण खेळीत 8 षटकार मारले. आयपीएलमध्ये पूरनने 15 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले आहे. (Photo: LSG Twitter)

3 / 5
निकोलस पूरनने केलेले अर्धशतक आणि षटकार पाहता, त्याने प्रत्येक दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला आहे. निकोलस पूरनने आपल्या अर्धशतकासह मोठा विक्रम रचला आहे.  निकोलस पूरन हा लखनौ सुपरजायंट्ससाठी सर्वात जलद अर्धशतक करणारा खेळाडू आहे. (Photo: IPL/BCCI)

4 / 5
निकोलस पूरनचं हे 20 पेक्षा कमी चेंडूत पाचवं अर्धशतक आहे. यासह त्याने वैभव सूर्यवंशीला मागे टाकलं आहे. वैभव सूर्यवंशीने हा पराक्रम चार वेळा केला आहे. तर अभिषेक शर्माने हा पराक्रम सर्वाधिक सहा वेळा केला आहे. (Photo: IPL/BCCI)

5 / 5
निकोलस पूरनने या अर्धशतकाने आपल्या संघाची रणनीती चुकीची ठरवली. मागील आठ सामन्यांमध्ये त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले नव्हते, पण मुंबईविरुद्ध पूरनला त्याच्या सर्वोत्तम क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि त्याने स्वतःला सिद्ध केले. (Photo: LSG Twitter)

Follow Us