IPL 2026: वैभव सूर्यवंशीकडे नंबर 1 होण्याची संधी, पंजाबविरुद्ध इतक्या धावा करताच मिळणार मानाचं स्थान
आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीचा वणवा पेटला आहे. समोर जो गोलंदाज येईल त्याचा तितक्याच ताकदीने सामना करत आहे. आयपीएल 2026 स्पर्धेत आता त्याच्याकडे मोठा विक्रम करण्याची संधी आहे. पंजाबविरुद्ध दोन मोठ्या कामगिरी करू शकतो.

आयपीएल 2026 स्पर्धेतील 40वा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. हा सामना मुल्लापूरच्या महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी मोठा कारनामा करू शकतो. (Photo: Rajasthan Royals Twitter)

वैभव सूर्यवंशीने मागच्या सामन्यात फक्त 36 चेंडूत शतक ठोकलं होतं. या पर्वात त्याने 8 सामन्यात 357 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि दोन अर्धशतकं आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आहे. (Photo: Rajasthan Royals Twitter)

पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात 24 धावा करताच ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पहिलं स्थान गाठेल. त्यामुळे त्याला या सामन्यात ऑरेंज कॅपचा मान मिळण्याची मोठी संधी आहे. वैभव सूर्यवंशीचा फॉर्म पाहता आरामात या धावा करू शकतो, असा दावा क्रीडाप्रेमी करत आहेत. (Photo: Rajasthan Royals Twitter)

वैभव सूर्यवंशी आणखी एका विक्रमापासून 43 धावा दूर आहे. या सामन्यात त्याने आक्रमकपणे 43 धावांची खेळी केली तर 400 धावांचा पल्ला गाठेल. पण एका पर्वात 230हून अधिकच्या स्ट्राईक रेटने 400 किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरेल. (Photo: Rajasthan Royals Twitter)

वैभव सूर्यवंशीने मागच्या पर्वात अशीच आक्रमक फलंदाजी केली होती. त्याने 206.55 च्या स्ट्राईक रेटने 252 धावा केल्या होत्या. यात त्याने 35 चेंडूत शतकही ठोकलं होतं. मागच्या पर्वात पंजाब किंग्सविरुद्ध वैभव सूर्यवंशीने 15 चेंडूत 40 धावा केल्या होत्या. यात 4 चौकार आणि 4 षटकार होते. (Photo: Rajasthan Royals Twitter)