IPL 2026 Auction : 369 खेळाडूंची जबाबदारी, कोण आहेत ऑक्शनर मल्लिका सागर?

IPL Auctioneer Mallika Sagar Net Worth : आयपीएल 2026 मिनी ऑक्शनमध्ये मल्लिका सागर या ऑक्शनर असणार आहेत. मल्लिका सागर या मिनी ऑक्शनमध्ये एकूण 369 खेळाडूंची नावं घेणार आहेत. या निमित्ताने जाणून घ्या मल्लिका सागर यांच्याबाबत.

| Updated on: Dec 16, 2025 | 2:27 PM
1 / 5
आयपीएल 2026 च्या मिनी ऑक्शमधून 369 खेळाडूंचा फैसला होणार आहे.  बीसीसीआयने या मिनी ऑक्शनसाठी 350 खेळाडूंची नावं अंतिम केली होती. मात्र त्यानंतर 19 खेळाडूंची नावं जोडण्यात आली. या 19 व्या मोसमासाठी 16 डिसेंबरला मिनी ऑक्शन पार पडणार आहे. या मनी ऑक्शनमध्ये ऑक्शनरच्या भूमिकेत असलेल्या महिलेबाबत आपण जाणून घेणार आहोत. (Photo Credit: IPL/WPL/X)

2 / 5
मल्लिका सागर या मिनी ऑक्शनमध्ये ऑक्शनरच्या भूमिकेत असणार आहेत. मल्लिका सागर याने 2024 आणि 2025 मध्येही ऑक्शनर म्हणून होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा मल्लिका सागर ऑक्शनर म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. मल्लिका सागर या आयपीएलच्या इतिहासातील पहिल्या महिला ऑक्शनर आहेत. (Photo Credit: IPL/WPL/X)

3 / 5
मल्लिका सागर यांनी आयपीएल व्यतिरिक्त डब्ल्यूपीएल आणि प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या ऑक्शनमध्ये ऑक्शनर म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. तसेच मल्लिका सागर वयाच्या 26 व्या वर्षी न्यूयॉर्कमधील क्रिस्टीजसाठी ऑक्शन करणाऱ्या पहिल्या महिला होत्या. (Photo Credit: IPL/WPL/X)

4 / 5
मल्लिका सागर यांनी मुंबई आणि यूएसएमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. मल्लिका सागर यांचं नेटवर्थ हे 125 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. मल्लिका सागर यांनी ऑक्शनच्या माध्यमातून तगडी कमाई केली आहे. तसेच मल्लिका सागर यांचा जाहीरात हा कमाईचा स्त्रोत आहे. (Photo Credit: IPL/WPL/X)

5 / 5
आयपीएल 2026 या 19 व्या मोसमासाठी एकूण 10 संघांना जास्तीत जास्त 77 खेळाडूंची गरज आहे. त्यासाठी मल्लिका सागर या ऑक्शनर म्हणून जबाबदारी पार पाडताना दिसणार आहेत. (Photo Credit: IPL/WPL/X)