IRE vs IND : जय मूंद्राची कमाल, संजू सॅमनसचा पहिल्या बॉलवर करेक्ट कार्यकम, आयर्लंडच्या गोलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी
Ireland vs India 1st T20i : आयर्लंड विरूद्धच्या पहिल्याच टी 20i सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. अनुभवी फलंदाज संजू सॅमसन स्वस्तात आऊट झाला. डेब्युटंट जय मुंद्रा याने संजूला टी 20i कारकीर्दीतील पहिल्याच बॉलवर बोल्ड केलं.

संजू सॅमसन आयर्लंड विरूद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात अपयशी ठरला. संजू 5 धावांवर बोल्ड झाला. मुळ भारतीय वंशाच्या जय मुंद्रा याने पदार्पणातील सामन्यातच संजूला आऊट केलं. (PC-GETTY IMAGES)

जय मुंद्राने टी 20i कारकीर्दीतील पहिल्याच बॉलवर संजूला आऊट करत इतिहास घडवला. जय आयर्लंडतडून टी 20i कारकीर्दीत पहिल्या बॉलवर विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला. (PC-GETTY IMAGES)

आयर्लंडसाठी जयआधी टी 20i क्रिकेटमध्ये मॅथ्यू हंप्रेस याने 2023 साली पहिल्या बॉलवर विकेट मिळवली होती. मॅथ्यूने बांगलादेशच्या रिशाद हुसैन याला आऊट करत ही कामगिरी केली होती. (PC-GETTY IMAGES)

आयर्लंडसाठी वनडे क्रिकेटमध्ये दिग्गज ऑलराउंडर केवीन ओब्रायन यांनी पहिल्या बॉलवर विकेट घेण्याची कामगिरी केली होती. त्यांनी 2006 साली वनडे डेब्यूत इंग्लंडच्या अँड्यू स्ट्रॉस याला आऊट केलं होतं. (PC-GETTY IMAGES)

जय मुंद्रा हा मुळचा राजस्थानचा आहे. जय वयाच्या 24 वर्षी नोकरीनिमित्ताने आयर्लंडला गेला होता. जय तेव्हापासून आयर्लंडमध्येच आहे. जयने या दरम्यान क्लब क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली. त्यामुळे जयला आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. (PC-GETTY IMAGES)