जसप्रीत बुमराहच्या शिरपेचात मानाचा तुरा, ऐतिहासिक कामगिरीसाठी मिळाला आयसीसीकडून सन्मान

जसप्रीत बुमराह भारतीय गोलंदाजीचं प्रमुख अस्त्र आहे. भल्याभल्या फलंदाजांना त्याचा सामना करताना घाम फुटतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याच्या गोलंदाजीची जादू दिसली. सध्याच्या स्थितीत त्याच्या आसपास इतर गोलंदाज दिसत नाहीत. असं असताना त्याच्या कामगिरी दखल आयसीसीने घेतली आहे.

| Updated on: Jan 27, 2025 | 6:42 PM
1 / 5
आयसीसीने भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला 2024 सालचा कसोटी क्रिकेटर म्हणून निवडले आहे. 2024 मध्ये संस्मरणीय कामगिरी करणाऱ्या जसप्रीत बुमराहची वर्षातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू म्हणून निवड झाली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही त्याने आपल्या गोलंदाजीची धार दाखवली होती.

2 / 5
जसप्रीत बुमराहने 2023 साली पाठीच्या दुखापतीतून सावरत कमबॅक केलं होतं. त्यानंतर त्याने आपल्या कामगिरीने सर्वांची दाद मिळवली. मागच्या वर्षी इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. इतकंच काय तर दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलियातही यशस्वी ठरला.

3 / 5
जसप्रीत बुमराह 2024 मध्ये 13 कसोटी सामने खेळला. यात त्याने 14.92 च्या सरासरीने 71 विकेट घेतल्या. मागच्या वर्षी कसोटी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून त्याला मान मिळाला. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही गोलंदाजाला 60 विकेटचा आकड्यापर्यंत पोहोचता आलं नाही.

4 / 5
आयसीसी कसोटी क्रिकेटर ऑफ द ईयर पुरस्कार मिळवलेला जसप्रीत बुमराह हा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज आहे. यापूर्वी हा मान कोणत्याच भारतीय वेगवान गोलंदाजाला मिळालेला नाही. यापूर्वी राहुल द्रविड, गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, रविचंद्रन अश्विन आणि विराट कोहलीने हा किताब जिंकला आहे.

5 / 5
जसप्रीत बुमराहने हा पुरस्कार मिळवल्यानंतर सांगितलं की, 'हा फॉर्मेट मला खूपच आवडतो. मी कायम कसोटी क्रिकेट खेळू इच्छित होतो. मागचं वर्ष माझ्यासाठी खूप चांगलं गेलं. मी खूप काही शिकलो आणि सामनेही जिंकलो. वायझॅगमध्ये ओली पोपची विकेट माझ्यासाठी खूप खास होती. या विकेटमुळे सामन्याचं पारडं बदललं. हा पुरस्कार मिळाल्याने खूश आहे.'