0,0,0,0,0,0..! जसप्रीत बुमराहभोवती शून्याचा षटकार, सात कसोटीत झालं असं काही…

लॉर्ड्स येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीचा पहिला डाव पार पडला. इंग्लंडने केलेल्या 387 धावांच्या बदल्यात भारताने तितक्याच धावा केल्या. या मालिकेत जसप्रीत बुमराहच्या नावावर आणखी एक शून्य नोंदवला गेला आहे.

| Updated on: Jul 13, 2025 | 7:38 PM
1 / 5
जसप्रीत बुमराह हा भारतीय गोलंदाजीचा मुख्य कणा आहे. त्याच्या गोलंदाजीवर प्रतिस्पर्धी संघांची दाणादाण उडते. लॉर्ड्समध्येही त्याच्या गोलंदाजीचा प्रभाव दिसला. त्याने पहिल्या डावात 74 धावा देत 5 गडी बाद केले. (फोटो- पीटीआय)

2 / 5
पहिल्या डावात गोलंदाजीत प्रभावी ठरलेला जसप्रीत बुमराह फलंदाजीत मात्र फेल गेला. त्याला एकही धाव काढता आली नाही. जसप्रीत बुमराह सलग चौथ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. मागच्या 7 डावात बुमराह सहाव्यांदा शून्यावर बाद झाला. (फोटो- पीटीआय)

3 / 5
जसप्रीत बुमराहने मागच्या सात डावात फक्त 22 धावा केल्या आहेत. यात सहा वेळा शून्यावर बाद झाला आहे. त्याने शेवटच्या सात डावात 0,0,22,0,0,0,0 अशी कामगिरी केली आहे. (फोटो- पीटीआय)

4 / 5
कसोटी क्रिकेटमध्ये 72 डावात फलंदाजी करणारा जसप्रीत बुमराह 28 वेळा शून्यावर बाद झाला आहे. यासह, कसोटी इतिहासात सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झालेल्या फलंदाजांच्या यादीत दहाव्या स्थानावर आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा दुसरा भारतीय आहे. (फोटो- पीटीआय)

5 / 5
इशांत शर्मा अव्वल स्थानावर आहे. भारताकडून 142 कसोटी डावात फलंदाजी करणाऱ्या इशांतने शून्यावर 34 बळी घेतले आहेत. यासह, तो कसोटीत सर्वाधिक शून्य बळी घेणारा भारतीय खेळाडू बनला आहे. (फोटो- पीटीआय)