
न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतून केन विल्यमसनने जवळपास एक वर्षाने पुनरागमन केलं आहे. पुनरागमनच्या सामन्यातच त्याने अर्धशतक झळकावून एक विक्रम रचला. न्यूझीलंडसाठी अशी कामगिरी करणारा एकमेव फलंदाज ठरला आहे. (Photo- New Zealand Cricket Twitter)

क्राइस्टचर्चमधील हेन्ली ओव्हल येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने पहिल्याच षटकात डेव्हॉन कॉनवे विकेट गमावली. संघ दडपणात असताना क्रिजवर आलेल्या केन विल्यमसनने जबाबदारीने फलंदाजी केली. Photo: Getty Images)

केन विल्यमसनने वेस्ट इंडिजविरुद्ध 102 चेंडूत 52 धावा केल्या. यात 6 चौकारांचा समावेश होता. वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करणारा न्यूझीलंडचा दुसरा फलंदाज ठरला. याआधी रॉस टेलरने (1136) अशी कामगिरी केली होती. (Photo: PTI)

केन विल्यमसन आता वेस्ट इंडिजविरुद्ध 18 डावात 1000 धावा पूर्ण केल्या. यासह पाच देशांविरुद्ध कसोटीत एक हजाराहून धावा करणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला. त्याने यापूर्वी इंग्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका विरुद्ध कसोटीत एक हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. (Photo: AFP)

पाच देशांविरुद्ध कसोटी सामन्यात हजाराहून अधिक धावा करणाऱ्या विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. इतकेच नाही तर असा पराक्रम करणारा न्यूझीलंडचा एकमेव फलंदाज असल्याचा विक्रमही रचला आहे. (Photo: PTI)