खरंच की काय! केकेआरचा मोठा प्लान, केएल राहुलला ट्रेड करण्यासाठी टाकले असे फासे

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी ट्रेड विंडोचा पर्याय खुला झाला आहे. अशा स्थितीत प्रत्येक फ्रेंचायझी आपल्या संघात दुरूस्ती करण्यासाठी प्रयत्नशील आहे. खासकरून चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ यासाठी आग्रही आहेत. आता केकेआरने एक डाव टाकल्याची चर्चा आहे.

| Updated on: Aug 28, 2025 | 9:54 PM
1 / 6
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी फ्रेंचायझींची मोर्चेबांधणी सुरु आहे. मिडिया रिपोर्टनुसार, केएल राहुलला संघात घेण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाने रूची दाखवली आहे. इतकंच काय तर कर्णधारपदही सोपवण्याची तयारी असल्याचं बोललं जात आहे.

2 / 6
केएल राहुलला मागच्या पर्वात दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायझीने 14 कोटी रुपयांना खरेदी केली होते. त्याने मागच्या पर्वात 13 सामन्यात 539 धावा केल्या होत्या. एका सामन्यात कौटुंबिक कारणास्तव खेळला नव्हता.

3 / 6
मिडिया रिपोर्टनुसार, कोलकाता नाईट रायडर्स फ्रेंचायझीने केएल राहुलसाठी दिल्ली कॅपिटल्सशी चर्चा केली आहे. कारण संघाला एक चांगला खेळाडू हवा आहे. त्यात केएल राहुलकडे कर्णधारपदाचा अनुभव आहे.

4 / 6
मागच्या पर्वात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात केकेआरची कामगिरी निराशाजनक राहिली होती. त्यामुळे या पर्वात नव्या कर्णधाराची संघाला गरज आहे. इतकंच काय तर केकेआर मागच्या पर्वात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना रिलीज करू शकते.

5 / 6
केएल राहुलला संघात घेतलं तर एकाच वेळी तीन समस्या सुटू शकतात. केएल राहुल संघासाठी ओपनिंग करू शकतो. विकेटकीपर म्हणून भूमिका बजावू शकतो. तसेच कर्णधार म्हणून अनुभव गाठीशी आहे.

6 / 6
सोशल मीडियावरील एका अफवा अशी देखील उडाली आहे की, केकेआर केएल राहुलसाठी 25 कोटी खर्च करण्यास तयार आहे. पण इतकी रक्कम पर्समध्ये आणण्यासाठी काही खेळाडू रिलीज करावे लागतील. आता हा निव्वळ अफवा आहेत की प्रत्यक्षात काही घडतं हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.  (सर्व फोटो- टीव्ही 9 कन्नडवरून)