दुसऱ्या कसोटीत टीम इंडिया संकटात, पण कुलदीप फलंदाजी रचला अनोखा विक्रम, जाणून घ्या

दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. दक्षिण अफ्रिकेने केलेल्या 489 धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया फक्त 201 धावा करू शकली. मधल्या फळीतील फलंदाज फेल गेले असताना कुलदीप यादवने मात्र चांगला डिफेन्स केला. यासह त्याने एका विक्रमाला गवसणी घातली आहे.

Updated on: Nov 24, 2025 | 9:56 PM
1 / 5
कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी आठव्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. यात दोघांनी मिळून 208 चेंडूंचा सामना केला. वॉशिंग्टन सुंदरने यात 45 आणि कुलदीप यादवने 19 धावांचं योगदान दिलं.  या खेळीत कुलदीप यादवने एक विक्रम रचला.  (Photo- BCCI Twitter)

2 / 5
दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात कुलदीप यादवने एकूण 134 चेंडूंचा सामना केला. यासह त्याने राहुल द्रविडचा दुर्मिळ विक्रम मोडला. 100 चेंडूंचा सामना केल्यानंतर कुलदीप यादवने घरच्या मैदानावर झालेल्या कसोटीत सर्वात कमी स्ट्राइक रेटचा विक्रम केला.  (Photo- PTI)

3 / 5
2004 मध्ये नागपूर येथे झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात राहुल द्रविडने अगदी 140 चेंडूंचा सामना केला होता आणि फक्त 21 धावा काढल्या होत्या.  (Photo- Getty Images)

4 / 5
कुलदीप यादवने हा विक्रम मोडला आहे. गुवाहाटीमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांचा सामना करत कुलदीपने 14.17 च्या स्ट्राईक रेटने 134 चेंडूत फक्त 19 धावा केल्या. भारतातील कसोटी सामन्यात 100 चेंडूत सर्वात कमी स्ट्राईक रेट असलेला भारतीय फलंदाज बनला आहे. (Photo: PTI)

5 / 5
या सामन्यात कुलदीप यादव वगळता कोणत्याही भारतीय फलंदाजाने 100 चेंडूंचा सामना केला नाही. याचा अर्थ असा की गोलंदाज कुलदीप यादव क्रीजवर अडकल्यामुळे भारतीय संघाने लवकर ऑलआउट टाळले. (Photo: PTI)