
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडला आणि संघांची उलथापालथ झाली. पण या स्पर्धेपूर्वी दिग्गज खेळाडूंच्या दुखापतीमुळे टेन्शन वाढलं आहे. असं असताना लखनौ सुपर जायंट्सच्या गोटात आनंदाची बातमी आहे. कारण स्टार खेळाडू दुखापतीतून सावरला असून खेळण्यासाठी सज्ज आहे.

ईएसपीएनक्रिकइन्फोच्या मते, ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श दुखापतीतून सावरला आहे. तसेच पूर्णपण फिट असून खेळण्यासाठी सज्ज आहे. गेल्या काही दिवसांपासून खेळणार की नाही याबाबत चिंता होती. मात्र आता जीव भांड्यात पडला आहे. पण मार्श यंदाच्या स्पर्धेत फक्त फलंदाज म्हणून भूमिका बजवणार असल्याचं कळत आहे.

मिचेल मार्श 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच जखमी झाला होता. यामुळे त्यांना 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडावे लागले. गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर असलेला मार्श आता पुन्हा मैदानात उतरण्यास सज्ज आहे. मार्श गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता.

लखनौ संघात असलेल्या मार्शने आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 42 सामन्यांमध्ये 19.55 च्या सरासरीने 3 अर्धशतकांसह 665 धावा केल्या आहेत. मागच्या पर्वात मार्शला खराब फॉर्मचा सामना करावा लागला. चार सामन्यांमध्ये फक्त 61 धावा केल्या आणि त्याच्या गोलंदाजीतही त्याने खराब कामगिरी केली.

लखनौ संघ: ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड मिलर, एडेन मार्कराम, निकोलस पूरन, मिचेल मार्श, अवेश खान, मयंक यादव, मोहसिन खान, रवी बिस्नॉय, अब्दुल समद, आर्यन जुआल, आकाश दीप, हिम्मत सिंग, एम सिद्धार्थ, दिग्वेश सिंग, शाहबाज अहमद, आकाश सिंग, शमर जोसेफ, प्रिन्स यादव, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगकर, अर्शीन कुलकर्णी, मॅथ्यू ब्रेट्झके. (फोटो- टीव्ही 9 कन्नड)