
मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा याला अखेर सूर गवसला. रोहित शर्मा याने 20 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मॅचविनिंग खेळी केली. (Photo Credit : Ipl/Bcci)

रोहित शर्मा याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध आयपीएलच्या 18 व्या मोसमातील पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं. रोहितला या अर्धशतकासाठी 7 सामन्यांची वाट पाहावी लागली. (Photo Credit : Ipl/Bcci)

रोहितने चेन्नईविरुद्ध नाबाद 76 धावांची खेळी केली. रोहितने 168.89 च्या स्ट्राईक रेटने ही खेळी केली. रोहितने घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये 177 धावांचा पाठलाग करताना ही खेळी केली. (Photo Credit : Ipl/Bcci)

रोहितने मुंबईसाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं, ज्यामुळे मुंबईचा 9 विकेट्सने दणदणीत विजय झाला. रोहितने 168.89 च्या स्ट्राईक रेटने 76 धावांची ही खेळी केली. रोहितच्या या खेळीत 6 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश होता. (Photo Credit : Ipl/Bcci)

रोहितला या खास कामगिरीसाठी 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आलं. रोहित यासह आयपीएलमध्ये सर्वाधिक 20 वेळा हा पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. (Photo Credit : Ipl/Bcci)