
रोहित शर्माने दहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारून अर्धशतक पूर्ण केलं. त्याने आयपीएलमधील 47वं अर्धशतक ठोकलं आहे. रोहित शर्माने गुजरात टायटन्सविरुद्ध फक्त 28 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. त्याच्या या खेळीमुळे मुंबई इंडियन्स चांगल्या स्थितीत पोहोचली आहे. (Photo- IPL/BCCI)

रोहित शर्माने 50 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकार मारत 81 धावांची खेळी केली. प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजी फटका मारला पण राशीद खानच्या हाती झेल देऊन बाद झाला. या खेळीत रोहित शर्मा दोन जीवदान मिळाले. दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर, त्यानंतर तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर जीवदान मिळालं. (Photo- IPL/BCCI)

मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्टो यांनी प्लेऑफमधील दुसरी सर्वात मोठी भागीदारी केली आहे. या दोघांनी 84 धावांची भागीदारी केली. पार्थिव पटेल-लेंडल सिमन्स यांनी 2015 मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 90 धावांची भागीदारी केली होती. (Photo- IPL/BCCI)

या सामन्यात रोहित शर्माने 4 षटकार मारत इतिहास रचला. रोहित शर्मा आयपीएलमध्ये 300 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. (Photo- IPL/BCCI)

रोहित शर्माने गुजरात टायटन्सविरुद्ध शानदार फलंदाजी केली. त्याने 81 धावांची खेळी करत आयपीएलमध्ये 7 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.(Photo- IPL/BCCI)