मोहम्मद शमीने तिसरी विकेट घेताच वनडे क्रिकेटमध्ये नोंदवला मोठा विक्रम, ब्रेट ली-स्टार्कलाही टाकलं मागे

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचा पहिला सामना बांगलादेशशी होणार आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. पण सहाव्या विकेटसाठी तोहिद हृदोय आणि जाकेर अलीने १५० हून अधिक धावांची भागीदारी केली आणि टीम इंडियाच्या गोलंदाजांना चांगलंच झुंजवलं. असं असताना या सामन्यात तीन विकेट घेत मोहम्मद शमीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

| Updated on: Feb 20, 2025 | 5:53 PM
1 / 5
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिला सामना भारत आणि बांग्लादेश यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा  कौल बांगलादेशने जिंकला आणि प्रथम फलंदाजी घेतली. या सामन्यात अवघ्या ३५ धावांवर पाच विकेट तंबूत होते. पण सहाव्या विकेटसाठी तोहिद हृदोय आणि जाकेर अली यांनी १५४ धावांची भागीदारी केली. यासह बांगलादेशला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं.

2 / 5
भारताकडून मोहम्मद शमीने भेदक गोलंदाजी केली. पहिल्या स्पेलमध्ये दोन विकेट घेतल्या. त्यानंतर डेथ ओव्हरमध्ये आणखी एक विकेट घेत एक विक्रम आपल्या नावावर केला. तिसऱ्या विकेटसह मोहम्मद शमीने २०० विकेटचा पल्ला गाठला आहे. मोहम्मद शमी वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने २०० विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.

3 / 5
मोहम्मद शमीने ५१२६ चेंडूत २०० विकेटचा पल्ला गाठला आहे. यासह कमी चेंडूत २०० विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. मिचेल स्टार्कने ५२४० चेंडूत, सकलेन मुश्ताकने ५४५१ चेंडूत, ब्रेट लीने ५६४०, ट्रेंट बोल्टने ५७८३ चेंडूत, तर वकार युनिसने ५८८३ चेंडूत हा पल्ला गाठला आहे.

4 / 5
मिचेल स्टार्कने १०२ वनडे सामन्यात २०० विकेट घेण्याची किमया साधली होती. मोहम्मद शमी आणि सकलेन मुश्ताकने १०४ सामन्यात, ट्रेंट बोल्टने १०७ सामन्यात, ब्रेट लीने ११२ सामन्यात आणि एलन डोनाल्डने ११७ सामन्यात ही किमया साधली आहे.

5 / 5
दुसरीकडे, विराट कोहलीने या सामन्यात जाकेर अलीचा झेल पकडताच मोहम्मद अझहरूद्दीच्या विक्रमाची बरोबरी साधली. वनडे क्रिकेटमध्ये अझहरूद्दीने १५६ झेल, तर विराट कोहलीनेही १५६ झेल घेतल्या आहेत. सचिन तेंडुलकरने १४०, राहुल द्रविडने १२४ आणि सुरेश रैनाने १०२ विकेट घेतल्या आहेत.