मोहम्मद सिराजला ऐतिहासिक कामगिरीसाठी मिळाला आयसीसी पुरस्कार

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला आयसीसीकडून मानाचा पुरस्कार मिळाला आहे. ऑगस्ट २०२५ साठी आयसीसी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील 5 कसोटी सामन्यात 23 बळी घेतले होते. तसेच विजयात मोलाची भूमिका बजावली होती.

| Updated on: Sep 15, 2025 | 5:03 PM
1 / 5
भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला आयसीसी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवडण्यात आले. पुरस्काराच्या शर्यतीत न्यूझीलंडचा मॅट हेन्री आणि वेस्ट इंडिजचा जेडेन सील्स हे देखील होते. पण या दोघांना मागे टाकत सिराजने बाजी मारली.  (Photo- PTI)

2 / 5
इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका अनिर्णित राखण्यात मोहम्मद सिराजची महत्त्वाची भूमिका राहिली.. या दौऱ्यात 5 कसोटी सामन्यांपैकी 9 डावात त्याने सर्वाधिक 23 बळी घेतले. त्याने दोनदा पाच बळी आणि एकदा चार बळी घेतले. त्याने 32.43 च्या सरासरीने 23 बळी घेतले. (Photo- PTI)

3 / 5
ओव्हल कसोटीतील त्याच्या स्पेलने आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. ऑगस्टमध्ये त्याने खेळलेला हा एकमेव कसोटी सामना होता. म्हणूनच त्याला प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार मिळाला. दुसरीकडे, सिराजने संपूर्ण मालिकेत सर्वाधिक 1113 चेंडू टाकण्याचा विक्रम केला. (Photo- PTI)

4 / 5
ओव्हल कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये सिराजने 21.11 च्या सरासरीने एकूण 9 विकेट्स घेतल्या. या कामगिरीमुळे टीम इंडियाला कसोटी सामना जिंकता आला आणि मालिका बरोबरीत सोडवली. इतकंच काय इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सर्व कसोटी सामने खेळणारा मोहम्मद सिराज हा एकमेव भारतीय वेगवान गोलंदाज आहे. (Photo- Getty Images)

5 / 5
पुरस्कार मिळाल्यानतंर मोहम्मद सिराज म्हणाला की, "हा पुरस्कार माझ्यासाठी खूप खास आहे. अँडरसन-तेंडुलकर मालिका खूप संस्मरणीय होती. दोन्ही संघांमध्ये कठीण स्पर्धा होती. हा पुरस्कार माझ्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे जितका तो सपोर्ट स्टाफ आणि इतर खेळाडूंसाठी आहे. माझ्यावरील त्यांच्या विश्वासाचा हा विजय आहे. भारतीय जर्सीमध्ये नेहमीच माझे सर्वोत्तम देणे हे माझे ध्येय आहे." (Photo- Getty Images)