
आयपीएलच्या इतिहासात सर्वात अपयशी कर्णधारांच्या यादीत आरसीबीचा विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे. विराटच्या नेतृत्वात आरसीबीला 70 सामन्यात पराभूत व्हावं लागलंय.

रोहित शर्मा तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. रोहितने मुंबईला आपल्या कॅप्टन्सीत एकूण 5 वेळा आयपीएल चॅम्पियन केलं. मात्र रोहित कॅप्टन असताना मुंबईला 67 सामन्यात पराभूत व्हाव लागलं आहे.

चौथ्या स्थानी गौतम गंभीर आहे. गौतम गंभीरने आपल्या कॅप्टन्सीत केकेआरला 2 वेळा आयपीएलची ट्रॉफी मिळवून दिली. गंभीरने केकेआर व्यतिरिक्त दिल्लीचं नेतृत्व केलं. गंभीर कॅप्टन म्हणून 57 सामन्यांमध्ये अपयशी ठरला.

ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर पाचव्या क्रमांकावर आहे. वॉर्नरला 40 सामन्यात अपयश आलं. वॉर्नरनंतर एडम गिलख्रिस्टचा नंबर लागतो. गिलख्रिस्टच्या कॅप्टन्सीत एकूण 39 सामन्यात पराभव झाला आहे.

सक्रीय कर्णधारांच्या यादीत केएल राहुल टॉपर आहे. केएल 31, श्रेयस अय्यर 29 सामन्यात अपयशी ठरला आहे. तर संजू सॅमसनने कॅप्टन म्हणून 28 सामने गमावला आहेत.

तर सर्वात अपयशी कर्णधार असण्याचा नकोसा विक्रम हा महेंद्रसिंह धोनीच्या नावावर आहे. धोनीला कॅप्टन म्हणून तब्बल 91 सामने जिंकून देण्यात अपयश आलं आहे.