
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या 16व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमवून 199 धावा केल्या. तसेच विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं. यात नॅट स्कायव्हर ब्रंट मोलाचा वाटा राहीला. (Photo: BCCI/WPL)

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं हे चौथं पर्व आहे. आतापर्यंत झालेल्या तीन पर्वात कोणालाही शतक ठोकता आलं नव्हतं. पण ही किमया चौथ्या पर्वात नॅट स्कायव्हर ब्रंटने केली. तिने या स्पर्धेतील पहिलंवहिलं शतक ठोकण्याचा मान मिळवला. (Photo: BCCI/WPL)

नॅट स्कायव्हर ब्रंटने 57 चेंडूत 16 चौकार आणि 1 षटकार मारत नाबाद 100 धावा केल्या. यावेळी तिचा स्ट्राईक रेट 175.44 चा होता. चौकार आणि षटकारांच्या मदतीने तिने 70 धावा केल्या. (Photo: BCCI/WPL)

नॅट स्कायव्हर ब्रंटने शतक ठोकण्यापूर्वी पाच फलंदाज शतकाच्या वेशीवर आले होते. पण त्यांच्याकडून काही शतक झालं नाही. 2025 मध्ये जॉर्जिया वोलने नाबाद 99, 2023 मध्ये सोफि डिव्हाईने 99, 2023 मध्ये एलिसा हिलीने नाबाद 96, 2025 मध्ये बेथ मुनीने नाबाद 96 आणि स्मृती मंधानाने 2026 मध्ये 96 धावांची खेळी केली होती. (Photo: BCCI/WPL)

नॅट सायव्हर-ब्रंट म्हणाली, की मी ९० च्या आसपास काही खेळाडू बाद होताना पाहिले आहेत. म्हणून मला ते पुन्हा करायचे नव्हते. पण मला संघासाठी जास्तीत जास्त धावा करायच्या होत्या. आपण त्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकलो याचा मला खूप आनंद झाला. वैयक्तिकरित्या मलाही खूप आनंद झाला. (Photo: Mumbai Indians Twitter)