
भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंविषयी सर्वांनाच कौतुक आहे. पण सध्या WPL 2024 नंतर सर्वाधिक चर्चा होतेय ती आरसीबीची कॅप्टन स्मृती मानधना हिची... स्मृतीच्या खेळी अनेकांना चकित करते.

स्मृती मानधनाचं रिलेशनशीपबाबत काय मत आहे? यावर एका मुलाखतीदरम्यान स्मृतीने उघड भाष्य केलं. मुलगा चांगला हवा. माझं क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे माझ्या जोडीदाराने माझा खेळ समजून घेतला पाहिजे, असं स्मृती म्हणाली.

क्रिकेटची प्रॅक्टिस करावी लागते. त्यामुळे मी त्याला वेळ देऊ शकणार नाही. पण त्याने ते समजून घ्यावं. त्याने माझ्या भावनांचा आदर करावा आणि काळजी घ्यावी. इतक्याच माझ्या जोडीदाराकडून अपेक्षा आहेत, असं स्मृती म्हणाली. एका मुलाखती दरम्यान तिने हे मत मांडलं.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने या टीमने वुमन्स प्रीमियर लीग 2024 विजेतेपदावर पहिल्यांदा आपलं नाव कोरलं आहे. स्मृतीच्या नेतृत्वात आरसीबीने ही ट्रॉफी जिंकून आणली. त्यानंतर आरसीबीवर कौतुकाचा वर्षाव होतोय.

दरम्यान, गायक आणि म्युझिक कंपोजर पलाश मुच्छल आणि स्मृती रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत असते. स्मृती मानधना मूळची सांगलीची आहे. वयाच्या 27 व्या वर्षी स्मृतीने मिळवलेलं यश अनेकांना प्रेरणा देतं. तिच्या खेळीमुळे ती देशभरात चर्चेत असते.