6 4 6 4 6 4 6 4 4 6 4 4 4 6 4 4 6 6 4 जॅन निकोलने ठोकलं जलद शतक, चौकार षटकारांचा वर्षाव

| Updated on: Feb 27, 2024 | 2:51 PM

नामिबिया आणि नेपाळ यांच्यातील टी20 सामन्यात चौकार आणि षटकारांचा वर्षाव पाहायला मिळाला. नामिबियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमवून 206 धावा केल्या आणि विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं. जॅन निकोलचं वादळ यावेळी मैदानात पाहायला मिळालं. चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत नेपाळच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.

1 / 6
नामिबियाचा खेळाडू जॅन निकोल लोफ्टीने टी20 क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. टी20 क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा विश्वविक्रम आता जॅन निकोल लॉफ्टीच्या नावावर जमा झाला आहे. अवघ्या 33 चेंडूत शतक झळकावून नवा विश्वविक्रम रचला आहे.

2 / 6
नामिबियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. संघासाठी सलामीवीर मालन क्रुगरने (59) अर्धशतक झळकावत चांगली सुरुवात करून दिली. पण पाचव्या क्रमांकावर आलेल्या जॅन निकोल लॉफ्टीने संपूर्ण सामन्याचे चित्रच बदलून टाकले.

3 / 6
11व्या षटकात क्रीजवर आलेल्या निकोल लॉफ्टीने वादळी खेळी केली. त्याने मैदानात षटकार-चौकरांचा पाऊस पाडला. त्यामुळे नेपाळचे गोलंदाज पुरते हैराण झाले होते. लॉफ्टीने  अवघ्या 33 चेंडूत जलद शतक झळकावून नवा इतिहास लिहिला.

4 / 6
36 चेंडूंचा सामना करणाऱ्या जॅन निकोल लॉफ्टीने 8 उत्तुंग षटकार आणि 11 चौकारांसह 101 धावा केल्या. तसेच बाद होत तंबूत परतला. या स्फोटक शतकाच्या जोरावर नामिबियाच्या संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून 206 धावा केल्या.

5 / 6
जॅन निकोल लॉफ्टीने नेपाळविरुद्धच्या सामन्यात नेपाळच्या खेळाडूच्या नावावर असलेला विश्वविक्रम मोडला हे विशेष. अवघ्या 33 चेंडूत शतक पूर्ण करून जॉनने टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा खेळाडू ठरला आहे.

6 / 6
टी20 क्रिकेटमध्ये यापूर्वी हा विश्वविक्रम नेपाळ संघाच्या कुशल मल्लाच्या नावावर होता. कुशलने आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगोलियाविरुद्ध अवघ्या 34 चेंडूत शतक ठोकत विश्वविक्रमी शतक केले.