Asia Cup मध्ये आतापर्यंत टीम इंडियाच्या दोघांनीच केलाय कारनामा, रोहित-विराटला जमेल का?

Asia Cup | टीम इंडियाने आतापर्यंत सर्वाधिक वेळा आशिया कप जिंकण्याचा रेकॉर्ड केला आहे. मात्र आतापर्यंत टीम इंडियाकडून फक्त दोघांनाच ही कामगिरी करता आली आहे.

Sanjay patil | Updated on: Aug 21, 2023 | 7:54 PM
1 / 5
Asia Cup मध्ये आतापर्यंत टीम इंडियाच्या दोघांनीच केलाय कारनामा, रोहित-विराटला जमेल का?

2 / 5

माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धू हे वनडे आशिया कपमध्ये 'प्लेअर ऑफ द सीरिज' पुरस्कार जिंकणारे पहिलेच भारतीय ठरले. नवज्योत सिंह सिद्धू याने 1988 मध्ये ही कामगिरी केली होती. त्यानंतर 1995 मध्ये सिद्धू पुन्हा आशिया कप स्पर्धेत प्लेअर ऑफ द सीरिज ठरले. सिद्धू हे एकमेव भारतीय आहेत, ज्यांनी 2 वेळा हा पुरस्कार जिंकलाय.

3 / 5

टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन याने 2018 मध्ये हा पुरस्कार जिंकला होता. धवनने टीम इंडिया आशिया चॅम्पियन करण्यात तेव्हा मोठी भूमिका बजावली होती.

4 / 5

श्रीलंकेकडून माजी कर्णधार अर्जुन राणातुंगा (1986, 1997), सनथ जयसूर्या (2004), अजंता मेंडिस (2008) आणि लाहिरू थिरीमाने (2014) श्रीलंकेच्या हे 4 दिग्गज आशिया कपमध्ये प्लेअर ऑफ द सीरिज ठरले आहेत.

5 / 5

तसेच पाकिस्तानकडून माजी फलंदाज मोहम्मद युसूफ याने 2002 आणि बांगलादेशचा ऑलराउंडर शाकिब अल हसन याने 2012 मध्ये प्लेअर ऑफ द सीरिज हा पुरस्कार जिंकला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us