
आयपीएल 2024 स्पर्धेतील 7वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. हा सामना चेन्नईचं होमग्राऊंड चेपॉकवर खेळला गेला. हा सामना चेन्नईने 63 धावांनी जिंकला.

आयपीएल 2024 स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झाला. चेन्नईच्या होम ग्राउंड एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नईने 6 गडी राखून विजय मिळवला आहे.

आयपीएल 2024 स्पर्धेतील दुसरा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सचा 4 गडी राखून पराभव केला. पंजाबचं होमग्राउंड मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना झाला

तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झाला. कोलकात्याचं होमग्राउंड ईडन गार्डनवर हा सामना पार पडला. हा सामना कोलकात्याने 4 धावांनी जिंकला.

चौथा सामना राजस्थान रॉयल्सचं होमग्राउंड सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला गेला. हा सामना राजस्थान रॉयल्सने 20 धावांनी जिंकला.

पाचवा सामना गुजरातचं होमग्राउंड असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला गेला. मुंबई इंडियन्सला या सामन्यात 6 धावांनी पराभव सहन करावा लागला.

सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला गेला. हा सामना बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळला गेला. हा सामना बंगळुरुने 4 गडी राखून जिंकला. (सर्व फोटो- ट्विटर)