T20 World Cup नंतर भारतीय संघाचा चेहरा-मोहरा बदलणार, राहुल द्रविड ‘या’ नव्या चेहऱ्यांना देऊ शकतो संधी

| Updated on: Nov 09, 2021 | 5:44 PM

भारतीय संघाला यंदाच्या टी20 विश्वचषकात सेमीफायनलपर्यंतही पोहचता आलेलं नाही. पण आता आगामी सामन्यात उत्तम कामगिरीसाठी भारतीय संघ योग्य ते बदल नक्कीच करेल.

1 / 7
विश्वचषकाचा अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी झाल्यानंतर लगेचच भारतीय क्रिकेट संघ विविध अशा चार देशांना भारतात खेळण्यासाठी घेऊन येणार आहे. यामध्ये न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या संघाचा समावेश आहे. या सर्वात पहिलाच दौरा असणाऱ्या न्यूझीलंड संघाविरुद्ध टी20 मालिकेत संघनिवड करताना भारतीय संघ व्यवस्थापन कोणाला स्थान देणार? हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यात दिग्गज खेळाडू जसप्रीत बुमराह, केएल राहुल, मोहम्मद शमी, रवीचंद्रन अश्विन, ऋषभ पंत हे बऱ्याच काळापासून सामने खेळत असल्याने त्यांना विश्रांती दिली जाऊ शकते.

2 / 7
त्यात रवी शास्त्री यांच्यानंतर राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून काम सांभाळणार असल्याने तो संघ व्यवस्थापनाशी चर्चा करुन नेमकं कोणत्या खेळाडूंना संधी देतो हेही पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

3 / 7
तर यंदा संधी देण्यात येणाऱ्यांमध्ये ऋतुराज गायकवाड हे नाव जवळपास निश्चित आहे. कारण ऋतुने यंदाच्या आयपीएलमध्ये 16 सामन्यात तब्बल 635 धावा ठोकत ऑरेंज कॅपही मिळवली आहे. तो सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही उत्तम खेळत असल्याने त्याच सिलेक्शन नक्कीच होऊ शकतं.

4 / 7
तसंच यंदाच्या आय़पीएलमघ्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून समोर आलेला केकेआरचा वेंकटेश अय्यर हाही संघात असण्याची दाट शक्यता आहे. त्याने आयपीएलमध्ये 10 सामन्यात 370 करत विकेट्सही मिळवल्या आहेत

5 / 7
यांच्यानंतर यंदाची आय़पीएल गोलंदाजीने गाजवणारा हर्षल पटेलही संघात नक्कीच असू शकतो. त्याने सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅप मिळवली. त्याने 15 सामन्यात 32 विकेट्स मिळवल्या

6 / 7
पर्पल कॅपच्या शर्यतीत हर्षल पाठी असणारा दिल्ली कॅपिटल्सचा आवेश खानही संघात असण्याची दाट शक्यता आहे. खानने यंदाच्या आयपीएलमध्ये 16 सामन्यात 24 विकेट्स घेतले. त्यामुळे सर्व निवडकर्त्यांची नजर त्याच्यावर असणार हे नक्की!

7 / 7
या दोन्ही गोलंदाजांसह राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा चेतन सकारीयाही संघात असू शकतो. यंदाच्या आयपीएलमध्ये चेतनने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने 14 सामन्यात 14 विकेट्स पटकावल्या आहेत.