कधी पाहिल नाही की भेटले नाहीत..! नेमारचं नशिब चाहत्यामुळे चमकलं, एका झटक्यात 8800 कोटींचा मालक

फुटबॉल विश्वात नावलौकिक असलेला ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू नेमार ज्युनिअर याचं नशिब चमकलं आहे. एका झटक्यात त्याला 8800 कोटींची संपत्ती मिळाली आहे. या दोघांची कधीही भेट झाली नाही. पण त्याने आपल्या संपत्तीचा वारस म्हणून नेमार ज्युनिअर याला जाहीर केलं आहे.

Updated on: Sep 04, 2025 | 4:59 PM
1 / 5
ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू नेमार ज्युनिअर सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ही घटना मैदानातून नसून मैदानाबाहेरची आहे. कारण एका श्रीमंतर ब्राझीलियन उद्योगपतीने नेमार ज्युनिअरला आपल्या संपत्तीचा वारस घोषित केलं आहे. विशेष म्हणजे या दोघांची यापूर्वी कधीही भेट झाली नाही. (फोटो- Twitter)

2 / 5
ब्राझीलियन उद्योगपतीने 12 जून 2023 रोजी आपलं मृत्यूपत्र तयार केलं होतं. यात त्याने मालमत्ता, गुंतवणूक आणि शेअर्स नेमारला वारसाहक्काने मिळतील असं नमूद केलं आहे. सदर उद्योगपतीकडे 1 अब्ज डॉलर्स (8800 कोटी रुपये) किमतीची मालमत्ता असल्याचे वृत्त आहे. (फोटो- AFP)

3 / 5
ब्राझिलियन उद्योगपतीने आउटलेट मेट्रोपोल्सला सांगितले की, 'मला नेमार आवडतो. मी त्याच्यासारखाच आहे. मलाही बदनामीचा सामना करावा लागतो, मी  कौटुंबिक नातं जपणारा आहे. त्याचं वडिलांसोबतचे असलेले नाते मला माझ्या वडिलांशी असलेल्या नात्याची आठवण करून देते. ज्यांचे आधीच निधन झाले आहे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मला माहित आहे की तो लोभी नाही, जे आजकाल दुर्मिळ आहे.' (फोटो- Twitter)

4 / 5
नेमार नुकताच सौदी प्रो लीग क्लब अल-हिलालमधून त्याच्या जुन्या संघ सँटोसमध्ये परतला आहे. त्याचं संघातील  पुनरागमन त्याच्यासाठी खूप खास आहे. कारण सँटोस क्लबमधूनच त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. (फोटो- पीटीआय)

5 / 5
सँटोसमध्ये परतला असला तरी त्याच्यासाठी पुनरागमन काही खास राहिलं नाही. वास्को द गामाविरुद्धच्या 6-0 अशा पराभवाचा झटका सहन करावा लागला. यामुळे नेमार भावुक झाला आणि मैदानावर अश्रू ढाळताना दिसला. या पराभवाने केवळ नेमारच नाही तर संपूर्ण सँटोस संघ हादरला. त्यामुळे सँटोसच्या प्रशिक्षकाची हाकालपट्टी करण्यात आली आहे. (फोटो- Neymar Twitter)