
न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले असून 1-1 अशी बरोबरी झाली आहे. दुसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण अफ्रिकेला 68 धावांनी पराभूत केलं. यात डेवॉन कॉनवेचं योगदान महत्त्वाचं ठरलं. (Photo- New Zealand Cricket Twitter)

हॅमिल्टनच्या फलंदाजीसाठी कठीण असलेल्या खेळपट्टीवर कॉनवेने 49 चेंडूत 60 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 122.45 चा होता. त्याच्या या झुंजार खेळीमुळे न्यूझीलंडचा संघ 175 धावांपर्यंत मजल मारू शकला. तर दक्षिण अफ्रिकेचा संघ 107 धावांवर तंबूत परतला. (Photo- New Zealand Cricket Twitter)

डेवॉन कॉनवेने 39 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यात आणखी 10 धावांची भर घातल्यानंतर बाद झाला. बाद होण्यापूर्वी कॉनवेने उल्लेखनीय कामगिरीही केल्या. कॉनवेने तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून आपले 300 षटकार पूर्ण केले. (Photo- PTI)

डेवॉन कॉनवेने आपल्या खेळीत 2 षटकार मारले. यासह त्याने कॉनवेने टी20 क्रिकेटमध्ये 50 षटकारांचा टप्पा पूर्ण केला. डेवॉन कॉनवेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6000 धावा देखील पूर्ण केल्या. डेवॉन कॉनवेने 60 धावांची खेळी केली. त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. (Photo- टीव्ही 9 हिंदीवरून)

डेवॉन कॉनवे म्हणाला की, 'मला वाटतं माझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे भागीदारी उभारण्याचा प्रयत्न करणे, मी माझा जोडीदार आहे हे लक्षात ठेवून स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करणे. कारण टी20 क्रिकेटमध्ये तुम्ही खेळ पुढे नेण्याचा खूप प्रयत्न करत असता. त्यामुळे हो, मी भागीदारी उभारण्यापासून थोडं मागे हटण्याचा आणि स्वतःसाठी एक ध्येय निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहे.' (Photo- टीव्ही 9 हिंदीवरून)