
आगामी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानची नवी जर्सी लाँच केली आहे. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम, वेगवान गोलंदाज नसीम शाह आणि शादाब खान या तिघांनी नवी जर्सी परिधान केली आहे. तसेच या तिघांचा नव्या जर्सीतील नव्या लूकचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाकिस्तान क्रिकेट टीमच्या जर्सीवर India असं लिहिलं आहे. पाकिस्तानच्या जर्सीवर इंडिया असं नाव का, असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. पाकिस्तानने आपल्या नव्या जर्सीवर इंडियाचं नाव का लिहिलंय हे आपण जाणून घेऊयात. नियनांनुसार, यजमान देशाचं नाव आणि वर्ष याचा उल्लेख जर्सीवर करावा लागतो. त्या नियमानुसार पाकिस्तानने जर्सीवर India असा उल्लेख केला आहे.

वर्ल्ड कपआधी आशिया कप स्पर्धा पार पडणार आहे. आशिया कपचं यजमानपद हे पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव आणि वर्ष याचा स्पष्ट उल्लेख असणार आहे.

पाकिस्तान वर्ल्ड कप 2023 आधी नेदरलँड विरुद्ध खेळणार आहे. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

तसेच वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया-पाकिस्तान हे चीर प्रतिद्वंदी आमनेसामने असणार आहे. दोघांसाठी हा प्रतिष्ठेचा सामना असणार आहे. हा सामना 14 ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडणार आहे.