
पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. शाहिद आफ्रिदी 40 वर्षावरील टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेणार आहे. (PC-GETTY)

40 वर्षांवरील टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानच्या कराचीत करण्यात आलं आहे. ही स्पर्धा 21 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. तसेच अंतिम सामना 1 डिसेंबरला खेळला जाणार आहे. यात शाहीद आफ्रिदी खेळणार आहे. (PC-PSL)

पाकिस्तान वेटरन्स क्रिकेट असोसिएशनने बुधवारी निवेदनात स्पष्ट केलं की, आफ्रिदी या स्पर्धेत खेळणार आहे. पीवीसीने निवेदनात लिहिलं की, 'अष्टपैलू शाहिदी आफ्रिदी पुन्हा एकदा पाकिस्तानची जर्सी परिधान करण्यास सज्ज आहे. यावेळी 40 वर्षांवरील टी20 वर्ल्डकप 2025 स्पर्धेत खेळेल.' (PC-PSL)

शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानसाठी 27 कसोटी, 398 वनडे आणि 99 टी20 सामने खेळले आहेत. यात त्याने एकूण 476 षटकार मारले आहेत. (PC-PSL)

शाहिद आफ्रिदीने गोलंदाजीतही कमाल दाखवली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 541 विकेट घेतल्या आहेत. आता 40 वर्षावरील टी20 वर्ल्डकपमध्ये काय करतो याकडे लक्ष लागून आहे. (PC-PSL)