पाकिस्तानच्या खेळाडूचा धमाका, विश्वचषकातील खेळीने तोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड, कोहलीसह बाबरलाही टाकलं मागे

पाकिस्तान क्रिकेट संघाने यंदाच्या टी20 विश्वचषकात जबरदस्त कामिगिरी सुरुच ठेवली आहे. त्यांनी सर्वात आधी सेमीफायनलमध्ये जागा मिळवली आहे.

| Edited By: | Updated on: Nov 08, 2021 | 8:46 AM
1 / 4
यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तान क्रिकेट संघाने अप्रतिम कामगिरी करत सेमीफायनलपर्यंत मजल मारली आहे. यंदाचा विश्वचषक जिंकण्याच्या शर्यतीत पाक सर्वात पुढे आहे. दरम्यान संघाच्या एका खेळाडूने या विजयांत मोलाची कामगिरी पार पाडत एक रेकॉर्ड केला आहे. त्याने गेल, कोहली सारख्या दिग्गजांनाही मागे  टाकलं आहे.

2 / 4
हा खेळाडू म्हणजे पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिजवान. रिजवानने एका वर्षात सर्वाधिक टी20 धावा करण्याचा रेकॉर्ड केला असून त्याने युन्हीवर्सल बॉस ख्रिस गेलला मागे टाकलं आहे. स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात 15 धावा करताच रिजवानने 6 वर्ष जूना रेकॉर्ड तोडला. रिजवानने 38 डावांत 1 हजार 676 धावा केल्या आहेत. यात 1 शतक आणि 15 अर्धशतकं आहेत.

3 / 4
रिजवान आधी हा रेकॉर्ड नावावर असणाऱ्या ख्रिस गेलने 2015 साली 36 डावांत 1 हजार 665 रन्स केले होते. ज्यात 3 शतकं आणि 10 अर्धशतकं होती.

4 / 4
यंदा रिजवान बरोबर कर्णधार बाबर आजमही उत्तम फॉर्ममध्ये आहे.  बाबरने 2021 या वर्षात आतापर्यंत 36 डावांमध्ये  1 हजार 627 धावा केल्या असून यामध्ये 2 शतकं आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे.