
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. काही सेकंद आणि थोड्याशा फरकाने पदकं हुकत आहे. काही जणांना चौथ्या स्थानाचं दु:ख सहन करावं लागत आहे. असं असताना भारताला अजूनही सुवर्णपदकाची आस लागून आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेत मिळणाऱ्या पदकाच सोन्याचं प्रमाण फारच कमी असतं. यामध्ये प्रामुख्याने चांदी आणि लोखंडाचा वापर केला जातो.

वेल्थ नावाच्या इंस्टाग्राम पेजनुसार, पॅरिस ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकाचे वजन 529 ग्रॅम आहे आणि सुवर्णपदकाची किंमत 950 यूएस डॉलर आहे, जे सुमारे 79,740 रुपये आहे.

विशेष म्हणजे पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या पदकासाठी वापरलेले लोखंड फ्रान्समधील प्रसिद्ध आयफेल टॉवरमधून घेतले आहे

पदकासाठी 505 ग्रॅम चांदी, 6 ग्रॅम सोने वापरले आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या नियमांनुसार 95.4 टक्के म्हणजेच 505 ग्रॅम चांदी वापरली जाते.