गेमिंग फोनच्या बादशाहाने गाशा गुंडाळला,स्पर्धेला वैतागून बंद केला स्मार्टफोनचा व्यवसाय
या कंपनीचा एआय सर्व्हर व्यवसाय वेगाने वाढत जात आहे, गेल्या वर्षी या क्षेत्रात १००% वाढ झाली आहे. म्हणूनच,या ब्रँडने एक सुरक्षित मार्ग निवडला असून आपली स्मार्टफोन निर्मिती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये एका आणखी एका स्मार्टफोन कंपनीने आता आपला व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली आहे. आपण चर्चा करत आहोत Asus कंपनीची. जिने अलिकडेच नवा फोन लाँच करण्याची घोषणा केली होती. कंपनीने आता तिचे लक्ष पीसी आणि एआय डीव्हाईस तयार करण्याकडे वळवण्याचा निर्णय घेतला आहे. Asus कंपनी त्या कंपन्यांपैकी आहे जिने स्मार्टफोन मार्केटमध्ये आपले इनोव्हेशन जीवंत ठेवले होते. मात्र, आता या ब्रँडची कहाणी इतिहास जमा होणार आहे.
बराच कालावधीनंतर एका स्मार्टफोन कंपनीने तिचा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनी कंपन्याकडून सातत्याने होत असलेली स्पर्धा आणि बाजारातील बदलते डायनामिक्स पाहून Asus ने तिचा स्मार्टफोन बिजनस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काही वर्षांपूर्वी LG ने स्मार्टफोन मार्केटमधून पायउतार केला. परंतू एलजीची अवस्था Asus सारखी नाही.
स्मार्टफोन मार्केटपासून दूर
आता Asus ने लॅपटॉप आणि इतर व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू ही कंपनी आता स्मार्टफोन मार्केटपासून दूर जाणार आहे. कंपनीने स्पष्ट केले की आता 2026 कोणताही नवा फोन लाँच करणार नाही. Asus ची अवस्था Blackberry सारखी आहे. कारण दोन्ही कंपन्यांचा एक वेगळे मार्केट होते आणि यांच्या फोनचे चाहते देखील जास्त होते.
Asus चे चेअरमन जॉनी शिह यांनी कन्फर्म केले की ते त्यांचा ब्रँड कोणताही नवा फोन लाँच करणार नाही. Asus ने गेल्या वर्षी दोन फोनना ROG Phone 9 FE आणि Zenfone 12 Ultra ना लाँच केले होते. भारतात कंपनीने आधीच झेनफोनना लाँच करणे बंद केले होते.
का फेल झाली कंपनी?
ROG फोनचा विचार करता ही कंपनी मुळ रुपात हे फोन गेमिंग युजर्ससाठी तयार करत होती. हे फोन्स दमदार प्रोसेसर,हाय रिफ्रेश रेट वाल्या स्क्रीन आणि पॉवरफुल बॅटरी आणि चार्जिंग फिचर्ससोबत आले होते. म्हणजे हे काही गेमर्ससाठी तयार केले फोन होते. गेल्या काही वर्षात स्पेक्सच्या बाबतीत फोन्स खूपच चांगले झाले आहेत.
आता कोणत्याही ब्रँडच्या मिड रेंजच्या फोनमध्ये विविध गेम्स सहजपणे खेळता येत असतात. त्यामुळे केवळ गेमिंगसाठी एक फोन्स खरेदी करण्यात कोणाला रस फरसा रस नाही. शिवाय iQOO सारख्या ब्रँडने गेमिंग फोनना सामान्य फोनचे रंगरुप दिले आहे. या फोनमध्ये तुम्हाला कॅमेरा देखील चांगल्या क्वालिटीचा मिळतो.
