
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत तमाम भारतीयांच्या नजरा हॉकी उपांत्य फेरीच्या सामन्याकडे लागून आहेत. उपांत्य फेरीत भारत आणि जर्मनी यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात विजय मिळवताच भारताचं मेडल पक्कं होणार आहे. त्यामुळे या सामन्यातील विजय खूपच महत्त्वाचा आहे. अन्यथा कांस्य पदकासाठी जर तरची लढाई करावी लागेल.

भारत आणि जर्मनी यांच्यात आतापर्यंत 105 हॉकी सामने खेळेले गेले आहेत. यात जर्मनीचं पारडं जड आहे. जर्मनीने 53 सामने, तर भारताने 25 सामने जिंकले आहेत. तर 27 सामने अनिर्णित ठरले आहेत.

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारत आणि जर्मनी यांच्यात कांस्य पदकासाठी लढत झाली होती. या सामन्यात भारताने 5-4 ने विजय मिळवला होता. शेवटच्या क्षणात गोलकीपर श्रीजेशने जबरदस्त गोल बचाव केले. त्यामुळे 40 वर्षानंतर भारताला हॉकी ऑलिम्पिक पदक मिळालं.

मागच्या सहा सामन्यांचा विचार केला तर भारताचं पारडं जड आहे. भारताने 6 पैकी 5 सामन्या विजय मिळला आहे. शेवटचा सामना FIH प्रो लीगमध्ये झाला होता. यात जर्मनीने 3-2 ने विजय मिळवला होता.

भारत आणि जर्मनीचा गोल इतिहास पाहिला तर जर्मनी वरचढ आहे. जर्मनीने 227 गोल केले आहेत. तर भारताने 174 गोलं केले आहेत. (सर्व फोटो हॉकी इंडिया)