
आयपीएलमधील संयुक्तरित्या सर्वात यशस्वी टीम चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत तिघांनाच कर्णधार केलं आहे. यामध्ये विद्यमान कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्यासह रवींद्र जडेजा आणि सुरेश रैना याचा समावेश आहे.

लखनऊ सुपर जायंट्स टीमने आतापर्यंत दोघांना कॅप्टन केलं आहे. केएल राहुल याला 16 व्या हंगामात दुखापत झाल्यानंतर कृणाल पंड्या याने कर्णधारपद सांभाळलं होतं.

आरसीबी आणि केकेआर दोन्ही संघांनी संयुक्तरित्या 7-7 कॅप्टन बदलले आहेत. सध्या आरसीबी आणि केकेआरची कॅप्टन्सी सध्या फाफ डु प्लेसिस आणि श्रेयस अय्यर यांच्याकडे आहे. तर राजस्थान रॉयल्सने 6 खेळाडूंना कर्णधार केलं आहे.

mumbai indians

दिल्ली कॅपिट्ल्सने अनेक खेळाडूंना कॅप्टन्सी करण्याची संधी दिली आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने आतापर्यंत 13 खेळाडूंना कर्णधार केलं आहे.

पॅट कमिन्स हा सनरायजर्स हैदरबादचा 10 कर्णधार ठरला आहे. त्याला एडन मारक्रम याच्या जागी कॅप्टन केलं आहे.

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक कॅप्टन बदलण्याचा विक्रम हा पंजाब किंग्सच्या नावावर आहे. पंजाब किंग्सने आतापर्यंत एकूण 15 खेळाडूंकडून टीमची सूत्रं सांभाळून घेतली आहेत.