Raj Bawa Ravi Kumar : राज बावा रविकुमार यांच्या जोडीनं विजयाचा पाया रचला, निशांत सिंधूनं कळस चढवला

| Updated on: Feb 06, 2022 | 8:16 AM

निशांत सिंधू यानं फायनलमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजी एका बाजून सावरली. निशांत सिंधू यानं झळकावलेलं अर्धशतक क्रिकेट चाहत्यांच्या कायम स्मरणात राहिल. निशांत सिंधू यानं फायनलमध्ये चार चौकर आणि एका षटकारासह नाबाद 50 धावा केल्या.

1 / 6
अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियानं विजय मिळवला. इंग्लडविरोधातील मॅचमध्ये राज बावा याच्या ऑलराऊंड खेळीमुलं टीम इंडियानं विजयाला गवसणी घातली. राज बावाचे आजोबा ऑलम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या टीमचे सदस्य होते. वडिल सुखविंदर बावा हे कोच आहेत. राज बावानं अष्टपैलू खेळाडू व्हावं म्हणून ते प्रयत्न करत होते.

2 / 6
राज बावानं फायनलमध्ये अनेक विश्वविक्रम नावावर केले आहेत. राज बावा यानं 35 धावा करत संघाला विजय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची कामगिरी केली.

3 / 6
रविकुमार यानं इंग्लंडचे चार बॅटसमन आऊट केले. रविकुमार हा मूळचा उत्तरप्रदेशचा असून तो पश्चिम बंगालकडून क्रिकेट खेळतो.  त्याचे वडील सीआरपीएफमध्ये असून ते आसाम कार्यरत आहेत. बांग्लादेश, ऑस्ट्रेलिया आणि आयरलँड विरुद्ध च्या सामन्यात देखील रविकुमार यानं चांगली कामगिरी केली होती.

4 / 6
फायनलमध्ये महाराष्ट्राचा खेळाडू कौशल तांबे हा देखील चर्चेत राहिला. कौशल तांबे यानं अप्रतिम कॅच घेतला. कौशल तांबेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंग्लंडचा फॉर्मात असलेला खेळाडू जेम्स रियू याचा कॅच कौशल तांबे यानं घेतला. जेम्स रियू 95 धावांवर बाद झाला त्यामुळं इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कौशल हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील आहे.

5 / 6
निशांत सिंधू यानं फायनलमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजी एका बाजून सावरली. निशांत सिंधू यानं झळकावलेलं अर्धशतक क्रिकेट चाहत्यांच्या कायम स्मरणात राहिल. निशांत सिंधू यानं फायनलमध्ये चार चौकर आणि एका षटकारासह नाबाद 50 धावा केल्या. दिनेश बानासह त्यानं टीम इंडियाला विजेतेपद मिळेपर्यंत मैदानावर तळ ठोकला. निशांत हा हरियाणाचा असून त्याचे वडील बॉक्सर होते.

6 / 6
टीम इंडियाला विजेतेपद मिळवूण देणाऱ्या टीमचा कॅप्टन यश धुल हा नवी दिल्लीचा खेळाडू आहे. दिल्लीतील बालभवन स्कूल अकॅडमी येथे त्यानं क्रिकेटचं प्रशिक्षण घेतलं.