रवींद्र जडेजाने इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिला क्रिकेटपटू

भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी आयसीसीने कसोटी रँकिंग जाहीर केली आहे. यात रवींद्र जडेजाने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत बाजी मारली आहे. तसेच एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

| Updated on: May 14, 2025 | 2:46 PM
1 / 6
आर अश्विन, विराट कोहली आणि रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघाला या दिग्गजांची जागा भरून काढण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. असं असताना इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे.

2 / 6
आयसीसीने कसोटी क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यात रवींद्र जडेडा 400 गुणांसह पहिल्या क्रमांकावर कायम. यासह रवींद्र जडेजाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

3 / 6
रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत बऱ्याच दिवसापासून नंबर एक क्रमांकावर आहे. त्याची जागा आजही कायम असल्याने त्याच्या नावावर विक्रमाची नोंद झाली आहे.

4 / 6
रवींद्र जडेजा 9 मार्च 2022 ला वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला मागे टाकत कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आला. तेव्हापासून आतापर्यंत 38 महिन्यांचा कालावधी लोटला आहे. रवींद्र जडेजा नंबर वन पोझिशनवर 1152 दिवसांपासून कायम आहे.

5 / 6
कसोटी क्रिकेट अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजाची स्पर्धा  बांगलादेशच्या मेहदी हसन मिराजशी आहे. पण या दोघांच्या गुणांमध्ये खूपच फरक आहे. मेहदी हसन मिराजचे 327 गुण आहेत.

6 / 6
रवींद्र जडेजा यापूर्वी 2017 मध्ये कसोटीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर होता. पण तेव्हा त्याचं स्थान फक्त एका आठवड्यासाठी होतं. मात्र 2022 पासून रवींद्र जडेजा या स्थानावर कायम आहे. (सर्व फोटो - पीटीआय)