
भारताने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही फलंदाजीत कमाल केली आहे. नाणेफेकीचा कौल गमावल्याने प्रथम फलंदाजी आली. मात्र भारताने इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना करत 400 पार धावा केल्या आहेत. (Photo_BCCI)

भारताची पहिल्या डावात 5 गडी बाद 211 अशी स्थिती होती. निम्मा संघ तंबूत परतला होता. असं असताना कर्णधार शुबमन गिल आणि रवींद्र जडेजा यांनी झुंजार खेळी केली. सहाव्या विकेटसाठी 203 धावांची भागीदारी केली. (Photo_BCCI)

रवींद्र जडेजाचं कसोटी क्रिकेटमधील 23वं अर्धशतकं होतं. तसेच इंग्लंडविरुद्ध पाचवी अर्धशतकी खेळी ठरली. त्याने 80 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. या अर्धशतकी खेळीनंतर त्याने ट्रेडमार्क स्टाईलने तलवारबाजी सेलीब्रेशन केलं. (Photo_BCCI)

रवींद्र जडेजाने 137 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकार मारत 89 धावांची खेळी केली. पण जोश टंगच्या गोलंदाजडीवर जेमी स्मिथने त्याचा झेल पकडला आणि बाद होत तंबूत परतावं लागलं. त्याचं शतक अवघ्या 11 धावांनी त्याची मोठी संधी हुकली. (Photo_BCCI)

रवींद्र जडेजाने माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांची बरोबरी साधली आहे. SENA कसोटीत सातव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक 50हून अधिक धावा करणारा जडेजा संयुक्त दुसरा खेळाडू बनला आहे. जडेजाने 37 डावांमध्ये, तर कपिल देवने 50 डावांमध्ये 8 अर्धशतके झळकावली आहेत. तर ध धोनीने 52 डावात 10 अर्धशतकं ठोकली आहेत. (Photo_BCCI)